टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या Jio Phone च्या ग्राहकांसाठी 5 नवीन प्रिपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. 22 रुपयांपासून सुरू होणाऱ्या या प्लॅन्समध्ये दररोज 2जीबीपर्यंत डेटा आणि 28 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅन्समध्ये जिओ अ‍ॅप्सचं सबस्क्रिप्शनही मोफत मिळतं. सविस्तर जाणून घेऊया जिओच्या ऑल-इन-वन प्लॅन्सबाबत.

22 रुपयांचा प्लॅन
22 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी एकूण 2जीबी डेटा देत आहे. यात कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळेल. 28 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ सिक्युरिटीसोबत जिओ न्यूज अ‍ॅपचं फ्री सबस्क्रिप्शनही मिळेल.

52 रुपयांचा प्लॅन
52 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह एकूण 6जीबी डेटा मिळतो. याशिवाय जिओ टीव्हीसह जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ न्यूजचं फ्री सबस्क्रिप्शनही मिळेल. मात्र, डेटा पॅक असल्यामुळे या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि फ्री एसएमएसची सेवा मिळत नाही.

72 रुपयांचा प्लॅन
28 दिवस व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज 0.5जीबी (500MB) डेटा मिळतो. दिवसाची डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps इतका कमी होतो. या प्लॅनमध्येही कंपनी जिओ अ‍ॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शन देत आहे.

102 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनची वैधताही २८ दिवस असून यात दररोज 1जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्येही कंपनी जिओ अ‍ॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शन देत आहे. पण फ्री कॉलिंग आणि फ्री एसएमएसची सेवा मिळत नाही.

152 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये दररोज 2जीबी डेटा मिळतो. याशिवाय जिओ टीव्हीसह जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ न्यूजचं फ्री सबस्क्रिप्शनही मिळेल. पण या प्लॅनमध्येही फ्री कॉलिंग आणि फ्री एसएमएसची सेवा मिळत नाही. २८ दिवस इतकी या प्लॅनची व्हॅलिडिटी आहे.