30 November 2020

News Flash

399 रुपयांत अनलिमिटेड इंटरनेट, नवीन ग्राहकांना 30 दिवस फ्री ट्रायल; Jio Fiber ने लाँच केला स्वस्त प्लॅन

Jio ची सर्व नवीन ग्राहकांसाठी 30 दिवस फ्री ट्रायल सर्व्हिस

रिलायन्स जिओने सोमवारी Jio Fiber साठी नवीन स्वस्त टॅरिफ प्लॅन्सची घोषणा केली आहे. या नवीन प्लॅन्सद्वारे आता ग्राहक केवळ 399 रुपयांमध्ये अनलिमिटेड इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकतात. कंपनीने 399 ते 1499 रुपयांदरम्यान चार नवीन प्लॅन्स आणले आहेत. यासोबतच कंपनीने Jio Fiber च्या सर्व नवीन ग्राहकांसाठी 30 दिवस फ्री ट्रायल सेवा देण्याचीही घोषणा केली आहे.

399 रुपये, 699 रुपये, 999 रुपये आणि 1499 रुपयांचे चार प्लॅन :-
कंपनीने 399 रुपये, 699 रुपये, 999 रुपये आणि 1499 रुपयांचे चार प्लॅन आणले आहेत. यात 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 एमबीपीएस डेटा स्पीड मिळेल. अशाचप्रकारे 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 एमबीपीएस, 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 150 एमबीपीएस आणि 1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 300 एमबीपीएस डेटा स्पीड मिळेल. याशिवाय 1499 रुपयांचा प्लॅन घेणाऱ्या युजर्सना 12 टॉप ओटीटी अ‍ॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल. तर, 999 रुपयांचा प्लॅन घेणाऱ्यांना 11 टॉप अ‍ॅप्सचं सबस्क्रिप्शन मिळेल. मात्र, 399 रुपये आणि 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये ही सुविधा मिळणार नाही. सर्व प्लॅन्समध्ये फ्री व्हॉइस कॉलिंग सेवाही आहे.

30 दिवस फ्री ट्रायल :-
यासोबतच कंपनीने सर्व नवीन ग्राहकांसाठी 30 दिवस फ्री ट्रायल देण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत सर्व नवीन ग्राहकांना 150 एमबीपीएस डेटा स्पीड, 4के सेट टॉप बॉक्ससोबत 10 ओटीटी अ‍ॅप्सचं सबस्क्रिप्शन मिळेल. यामध्ये मोफत व्हॉइस कॉलिंगची सुविधेचाही ग्राहकांना लाभ घेता येईल. यावेळी बोलताना जिओचे डायरेक्टर

10 लाखांपेक्षा जास्त घरांमध्ये Jio Fiber :-
यावेळी, “जिओफायबर आधीच देशातील सर्वात मोठी फाइबर प्रोव्हाइडर असून 10 लाखांपेक्षा जास्त घरांमध्ये आम्ही पोहोचलो आहोत. पण भारत आणि भारतीयांसाठी आमचं स्वप्न खूप मोठं आहे. आम्ही प्रत्येक घरापर्यंत जिओफायबर पोहोचवू इच्छितो, याद्वारे देशातील प्रत्येक कुटुंबाला सशक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे”, असे जिओचे डायरेक्टर आकाश अंबानी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 2:50 pm

Web Title: jiofiber announces 30 day free trial for all new users and four new broadband plans price starts at rs 399 sas 89
Next Stories
1 OnePlus चा ‘स्वस्त’ स्मार्टफोन ‘फ्लॅश-सेल’मध्ये खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या डिटेल्स
2 पहिल्या सेलमध्ये 10 हजार 999 रुपयांत Moto G9 खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या ऑफर
3 आत्मनिर्भर भारत: चिनी अ‍ॅपला टक्कर, IIT बॉम्बेच्या विद्यार्थानं तयार केलं स्कॅनिंग अ‍ॅप
Just Now!
X