सध्या सुरू असलेल्या लकडाउनला समोर ठेवून टेलीकॉम कंपनी रिलायन्सच्या जिओने आपली बहुप्रतिक्षीत ई-कॉमर्स साइट जियोमार्ट लाँच केली आहे. आता ग्राहकांना घरबसल्या फळे, भाज्या, बेकरी, दुध आणि इतर जीवनावशक वस्तू मागवू शकतो. विशेष म्हणजे वेबसाइटवर एमआरपीच्या तुलनेत पाच टक्के कमी दराने विविध उत्पादने मिळणार आहेत.

कंपनीने मागील सहा महिन्यांपासून मुंबईतील काही भागांत या टेस्टिंग केली होती. आता जिओ मार्ट ही वेबसाइट लाँच करण्यात आली असून बर्‍याच पिन कोडसाठी ऑर्डर घेणे सुरू केले आहे. जिओ मार्ट या कंपनीने आपल्या शहरात वस्तू वितरण करीत आहे की नाही हे आपल्याला जाणून घ्यायचे असल्यास, यासाठी आपल्याला एक पिन कोड प्रविष्ट करुन तपासावे लागेल.

कसं कराल ऑर्डर –
सर्वात प्रथम तुम्हाला जिओ मार्टच्या https://www.jiomart.com/ या संकेतस्थळावर जावं लागेल. वेबसाइटवर गेल्यानंतर समोरच तुम्हाला एक बॉक्स येईल. त्यामध्ये तुमच्या एरियाचा पिन कोड टाकावा लागेल. तुमचं क्षेत्र ग्रीन झोनमध्ये असेल तर तुम्हाला जिओ मार्टची डिलिव्हरी घरपोच मिळेल.

तर मोफत डिलिव्हरी –
७५० रूपयांपेक्षा जास्त रुपयांची ऑर्डर असेल तर तुम्हाला मोफत डिलिव्हरी मिळणार आहे. ७५० पेक्षा कमी रूपयांच्या ऑर्डवरवर २५ रुपयांचं अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार आहे. महत्वाचं म्हणजे, ऑर्डरची शुल्क ऑनलाइन डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे करावं लागेल.

व्हाट्सअॅप ऑर्डर –
कंपनीने ग्राहकांची सुविघा लक्षात ठेवून डिलिव्हरीसाठी आपला व्हॉट्सअॅप नंबर जारी केला आहे. नवी मुंबई, ठाणे आणि कल्याणमधील ग्राहक या व्हाट्सअॅप क्रमांकावरून घरातील सामान ऑर्डर करू शकतात.

जियोमार्टवर कोणते प्रोडक्ट उपलब्ध आहेत ?
फळे, भाज्या, डेअरी, बेकरी, स्टेपल्स, स्नॅक्स, चाहा, कॉफी, पर्सनल केअर, घरातील उपयोगी सामान आणि लहान मुलांशीसंबधित सर्व सामान जिओ मार्टच्या संकेतस्थळावर उपलबद्ध आहे.