X
X

JIO ची भन्नाट ऑफर, ग्राहकांना थायलंडला जाण्याची संधी

करा फक्त एवढंच, मिळेल अवघ्या 10 सेकंदांचा अवधी

टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओ आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने नवनव्या सेवा आणत आहे. आता जिओ आपल्या ग्राहकांना थायलंडला जाण्याची संधी देत आहे. जिओने आपल्या ग्राहकांसाठी Jio Got Talent नावाची एक स्पर्धा सुरू केलीये.

चार फेब्रुवारीपर्यंत Jio Got Talent ही स्पर्धा सुरू असेल. या स्पर्धेत अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी ग्राहकांकडे आहे. मात्र यासाठी युजर्सना स्नॅपचॅटवर एक आकर्षक व्हिडिओ बनवायला लागेल. कंपनीने या स्पर्धेसाठी स्नॅपचॅटसोबत भागीदारी केलीये. गिफ्ट जिंकण्यासाठी ग्राहकांना एक 10 सेकंदांचा आकर्षक व्हिडिओ बनवायला लागेल. व्हिडिओ बनवण्यासाठी ग्राहकांना एक विशेष लेन्स देखील दिली जाईल. या स्पर्धेतील पहिल्या 100 विजेत्यांना गिफ्ट म्हणून कंपनी एका महिन्याचे रिचार्ज मोफत देईल. याशिवाय दोन ‘लकी’ विजेत्यांना थायलंडला जाण्याची संधी मिळेल. तर जाणून घेऊया या स्पर्धेबाबत –

-सर्वप्रथम स्नॅपचॅटमध्ये स्नॅप कोडला स्कॅन करावे लागेल

-आता जिओ गॉट टॅलेंट लेन्स ओपन करा

-येथे तुम्हाला दहा सेकंदांचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागेल

-त्यानंतर तुम्हाला Our Story मध्ये तुमचा प्रवेश म्हणजे व्हिडिओ अपलोड करावा लागेल.

22
First Published on: January 29, 2020 12:52 pm
Just Now!
X