‘नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रिकल्चर अ‍ॅण्ड रुरल डेव्हलपमेंट’ (NABARD) मध्ये ‘ऑफिस अटेंडंट’च्या एकूण ७३ पदांची भरती होणार आहे. तर महाराष्ट्र (मुंबई मुख्यालय)साठी एकूण रिक्त पदे २३ असून (अज- ८, इमाव- ६, ईडब्ल्यूएस्- २, खुला- ७) काही पदे विकलांग, माजी सनिक यांच्यासाठी राखीव आहेत.

उमेदवार फक्त एका राज्यातील रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.

पात्रता- (दि. १ डिसेंबर २०२०) ज्या राज्यातील पदांसाठी अर्ज करावयाचा आहे अशा राज्यातून उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. (पदवी आणि उच्चशिक्षण धारण करणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.)
वयोमर्यादा- दि. १ डिसेंबर २०१९ रोजी १८ ते ३० वर्षे (इमाव- ३३ वर्षापर्यंत, अजा/अज- ३५ वर्षापर्यंत, विधवा/परित्यक्ता महिला- ४० वर्षापर्यंत, दिव्यांग- ४०/४३/४५ वर्षापर्यंत)

निवड पद्धती-
(१) ऑनलाइन पूर्व परीक्षा – ऑब्जेक्टिव्ह टाईप वेळ ९० मिनिटे (टेस्ट ऑफ रिझिनग- ३० प्रश्न, इंग्लिश लँग्वेज- ३० प्रश्न, जनरल अवेअरनेस- ३० प्रश्न, न्यूमॅरिकल अॅबिलिटी- ३० प्रश्न, एकूण १२० प्रश्न व १२० गुण).

(२) ऑनलाइन मुख्य परीक्षा – ऑब्जेक्टिव्ह टाईप वेळ १२० मिनिटे (टेस्ट ऑफ रिझिनग)- ३५ प्रश्न, क्वांटिटेटिव्ह
अ‍ॅप्टिटय़ूड- ३५ प्रश्न, जनरल अवेअरनेस- ५० प्रश्न, जनरल इंग्लिश- ३५ प्रश्न, एकूण १५० प्रश्न व १५० गुण.
ऑनलाइन पूर्व परीक्षा ही फक्त पात्रता स्वरूपाची असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तराला १/४ गुण वजा केले जातील.

(३) लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट- मुख्य परीक्षेतून निवडलेल्या उमेदवारांना दहावी/ बारावीला मराठी विषय घेतला असल्यास त्यांना गुणपत्रिका सादर करावी लागेल व अशा उमेदवारांना लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागणार नाही.

अंतिम निवड यादी ऑनलाइन मुख्य परीक्षेतील गुणवत्तेवर आधारित राज्यनिहाय केली जाईल. राज्यातील रिक्त पदांच्या ५०% जागांसाठी प्रतीक्षा यादी बनविली जाईल.

प्री रिक्रूटमेंट ट्रेनिंग- अजा/ अज/ इमाव/ विकलांग कॅटेगरीतील निवडक उमेदवारांसाठी प्री रिक्रूटमेंट ट्रेनिंग नाबार्डतर्फे दिली जाणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी नाबार्डच्या रिजनल ऑफिस किंवा मुंबई मुख्यालयास लेखी कळवायचे आहे. ट्रेनिंगसाठी प्रवास खर्च, राहण्याचा/ जेवणाचा खर्च उमेदवारांना स्वत: करावयाचा आहे.

आणखी वाचा – दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी; ६०६० जागांची निघाली मेगाभरती

प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना http://www.nabard.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्ज १४ जानेवारी २०२० पर्यंत रिजनल ऑफिसला पोहोचतील असे पाठवावेत.

नाबार्ड मुख्यालयाचा पत्ता- ‘Head Office NABARD, C-24/G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051’

गोवा रिजनल ऑफिसचा पत्ता – – Goa Regional Office, NABARD, Nizari Bhavan, Menezes Brananza Road, Panaji – 403 001, Goa.

ऑनलाइन परीक्षा फेब्रुवारी २०२० मध्ये घेतली जाईल.

ऑनलाइन अर्ज http://www.nabard.org या संकेतस्थळावर दि. १२ जानेवारी २०२० पर्यंत करावेत.