19 January 2020

News Flash

वेगाने चालण्यातून दीर्घायुष्याची प्राप्ती

असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.

ज्यांना सर्वसाधारणपणे वेगाने चालण्याची सवय आहे, अशा व्यक्ती मंदगतीने चालणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत जास्त काळ जगू शकतात, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. याबाबतचा अभ्यास इंग्लंडमधील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ रिसर्च (एनआयएचआर)’ आणि ‘लीसेस्टर बायोमेडिकल रिसर्च सेंटर’मधील संशोधकांनी केला आहे. यासाठी त्यांनी चार लाख ७४ हजार ९१९ लोकांची माहिती तपासली आहे.

एखाद्या व्यक्तीचे वजन कितीही असले तरी त्याच्या चालण्याच्या वेगाचा त्याचे आयुर्मान वाढण्याशी संबंध दिसून येतो, असे या अभ्यासकांना दिसून आले आहे. प्रमाणापेक्षा कमी वजन असलेल्या व्यक्ती, ज्या मंदगतीने चालतात, त्यांचे आयुर्मान सर्वात कमी असते, असे दिसून आले आहे.

या प्रकारचे सरासरी आयुर्मान पुरुषांमध्ये ६४ वर्षे आठ महिने, तर महिलांमध्ये ७२ वर्षे चार महिने आढळले. याच प्रकारचे निष्कर्ष कमरेच्या परिघाबाबतही दिसून आले. व्यक्तीचे वजन किंवा लठ्ठपणाचा निकष बाजूला ठेवत त्याच्या चालण्याच्या वेगावरून त्याचे आयुर्मान ठरविण्याबाबतचे हे पहिलेच संशोधन आहे.

याबाबत इंग्लंडमधील लीसेस्टर विद्यापीठातील प्राध्यापक टॉम याट्स यांनी सांगितले की, एकाद्या व्यक्तीच्या आयुर्मानाचा अंदाज लावण्याबाबत त्याच्या वजनाच्या तुलनेत शारीरिक तंदुरुस्तीचे सापेक्ष महत्त्व किती आहे, हे स्पष्ट होण्यास आमच्या अभ्यासातून मदत होऊ शकते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे, कदाचित ‘बॉडी मास इंडेक्स’ (बीएमआय)पेक्षाही त्या व्यक्तीची शारीरिक तंदुरुस्ती हे त्याचे आयुर्मान ठरविण्याचे चांगले निदर्शक असते. लोकांना वेगाने चालण्यास प्रवृत्त केल्यास त्यांच्या आयुष्यात आणखी काही वर्षांची भर पडू शकते, असे ते म्हणाले. हा अभ्यास ‘मायो क्लिनिक प्रोसिडिंग्ज’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.

First Published on May 19, 2019 12:26 am

Web Title: jogging good for health
Next Stories
1 वजन वाढत नाहीये ? मग ‘हे’ उपाय कराच
2 World Hypertension Day 2019 : हायपरटेन्शनबद्दल समज आणि तथ्य
3 अमेरिकन गिरवणार अच्युत पालवांच्या देवनागरी सुलेखनाचा कित्ता
Just Now!
X