हातात पैसा असला की डोक आणि मन दोन्ही शांत असतात. कारण हव तसा, हवा तिथे पैसा खर्च करता येतो. पण तुमच्याकडे पैसे नसतील किंवा तुम्ही गरीब असाल तर त्यामुळे मेंदू आणि मानसिक क्षमतेवर परिणाम होतो, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे.
दारिद्र्य आलं तर त्याचा सरळ परिणाम तुमच्या मेंदूवर होतो. मानसिक ताणामुळे बौद्धिक क्षमतेवर १३टक्क्यांपर्यंत परिणाम होत असून काहीवेळा हे प्रमाण वाढण्याचीही शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. तसेच तर्क करण्याच्या क्षमतेत घट होते आणि मानसिक संतुलन बिघडायला लागते. ज्याप्रमाणे रात्री पुरेशी झोप झाल्याने चेतना क्षमतेत घट होते त्याप्रमाणेच आर्थिक विवंचनेत वाढ झाल्यानेही बौद्धिक क्षमतेत, बोधात्मक व तर्कशास्त्रातही घट होते, असे अर्थतज्ज्ञ आणि त्यांच्या सहका-यांनी संशोधन केले आहे. संशोधनकर्त्यांच्या निष्कर्षानुसार, पैशांच्या कमतरतेमुळे एखाद्या व्यक्तीची विचारशक्ती कमी होते. यामुळेच गरीब लोक अधिक बचत का करतात आणि अशी लोक इतरांकडून उधार का घेतात, याबाबतीची कारणेही जाणून घेता येतात.