डॉ. प्रदीप महाजन

अनेक शारीरिक समस्यांमध्ये त्रास देणारी एक समस्या म्हणजे संधिवात. बऱ्याच वेळा चाळीशी पार केलेल्या व्यक्तींमध्ये संधिवाताची समस्या असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अशा व्यक्तींना चालताना किंवा उठता-बसताना त्रास होतो. परंतु, संधिवात ही केवळ वयस्क व्यक्तींमध्येच आढळून येणारी समस्या नसून ती बऱ्याच वेळा तरुणांमध्ये किंवा किशोरवयीन मुलांमध्येही आढळून येते. याला जुवेनाइल आर्थ्ररायीस (जेए) असं म्हणतात.

जुवेनाइल आर्थ्ररायीस (जेए) हा एक अनुवाशिंक आजार आहे. एखाद्या व्हायरसच्या संसर्गामुळेही हा आजार मुलांना होऊ शकतो. या आजारात शरीर स्वतःच्याच निरोगी पेशींवर हल्ला चढवतो. परिणामी, सांध्यांवर सूज येऊ लागते. आपल्या शरीरात खांदे, कोपर, मनगटे, हिप्स आणि गुडघे येथे हाडांचे प्रमुख सांधे असतात. या सांध्यांमुळे चालणे, उठणे व बसणे शक्य होते. परंतु, या आजारात एका सांधा जरी कमकुवत झाला तरी आपल्या शरीराची हालचाल कमी होऊ लागते. त्यातच लहान मुलांना संधिवात झाला तर त्यांची शारीरिक वाढ खुंटते. त्यामुळे जाणून घेऊयात या आजारावरील काही उपचार पद्धती. –

उपचार पद्धती –

१. संधिवात असल्यास हाडांची झीज होऊन असह्य वेदना होतात. या वेदना दूर करण्यासाठी आवश्यक औषध आणि स्टेरॉईटचा वापर केला जातो. याशिवाय शरीराला पुरेसे व्हिटामिन मिळावेत यासाठी औषधही दिली जातात.

२. पौष्टिक आहाराचे सेवन करणे.

३. हाडांची झीज होत असल्यास कॅल्शियम किंवा ड जीवनसत्त्व शरीराला कसे मिळतील, याकडे लक्ष द्यावेत.

४. नियमित फिजिओथेरपी करावी.

उपचाराचे उद्दिष्ट –

१.आजाराच्या लक्षणांवर नियंत्रण मिळवता येते.

२.हाडांची झीज न होता ती दिर्घकाळ योग्य पद्धतीने कार्य करतील

३.शारीरिक वाढ आणि विकासाला प्रोत्साहन द्या

लहान मुलांच्या संधिवातावरील अत्याधुनिक उपचारपद्धती

१. अँटी-सायटोकीन थेरपी (Anti-cytokine therapy)

२. इम्यूनोथेरपी (Immunotherapy)

३. ट्रेग सेल थेरपी (Treg cell therapy)

४. एक्सोसोम्स (Exosomes)

एक्सोसोम्स या उपचारपद्धतीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे जुवेनाईल आर्थ्रायटीस असणाऱ्या लहान मुलांच्या उपचार हे फायदेशीर ठरते. यामुळे मुलांच्या वेदना आणि जळजळ कमी होते. याशिवाय मुलांच्या शरीरातील ऊतींचे नुकसान होण्यापासूनही वाचवते. त्यामुळे ही उपचारपद्धत एक वरदान ठरतेय. याव्यतिरिक्त प्रमाणित एक्सोसोम्स प्रयोगशाळेत विकसित केले जाऊ शकतात. त्यामुळे या उपचारामुळे मुलांची आजारातून सुटका होऊन ते निरोगी आयुष्य जगू शकतात.

(लेखक डॉ. प्रदीप महाजन हे रिजनेरेटिव्ह मेडिसिन रिसर्चर आहेत.)