जे विनोद करून इतरांची दाद मिळवतात त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहते, असे एका संशोधनात दिसून आले आहे.

जर्नल पर्सनॅलिटी अ‍ॅण्ड इंडिव्हिज्युअल डिफरन्ससेस या नियतकालिकात हास्यासंबंधीच्या संशोधनावर काही वेगळी मते व्यक्त करण्यात आली आहे. आधीच्या संशोधनानुसार स्वत:विषयीच विनोद करणारे लोक नकारात्मक मानसिक परिणामांचे शिकार बनतात. पण आताच्या संशोधनानुसार स्वत:वर विनोद करणारे लोक जास्त समाधानी व मानसिक स्वास्थ्य लाभलेले असतात. त्यांची सामाजिकता जास्त असते असे स्पेनच्या ग्रॅनडा विद्यापीठाचे जॉर्ज टॉरेस मरिन यांचे म्हणणे आहे. हसण्याला एक सकारात्मकतेचा अर्थ आहे. पण स्वत:वर विनोद करणाऱ्यांना नकारात्मक समजले जाते. प्रत्यक्षात तसे नाही, त्यासाठी आणखी संशोधन व सैद्धांतिक प्रारूपांची गरज आहे. असे याच विद्यापीठाचे ह्य़ुगो कार्टेरो डिऑस यांचे म्हणणे आहे.

नकारात्मक हेतू व भावना लपवण्यासाठी हास्याचा वापर होतो. जे लोक असा वापर करतात. ते प्रामाणिकतेच्या मोजपट्टीवर कमी असले तरी ते इतरांचा विश्वास कमावू शकतात. त्यातून त्यांचा पुढे फायदा होतो असे गिनेस नावारो कारिलो यांचे म्हणणे आहे.

हास्याचा वापर क्रोध नियंत्रणासाठी होतो. प्रतिकूल परिस्थितीतही विनोदाचा वापर स्वउत्थानासाठी होतो.

हास्याच्या मदतीने विनोदाचा वापर प्रभावीपणे करता येतो.