अमेरिकेच्या विद्यापीठातील संशोधकांचा निष्कर्ष; मानसिक स्थितीतही फरक

नि:सत्त्व आहार (जंक फूड) घेणाऱ्या व्यक्तींच्या शरीरात धोकादायक रसायने जातात, त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे एका अभ्यासाद्वारे स्पष्ट झाले आहे. ज्या व्यक्ती सतत अशा नि:सत्त्व पदार्थाचे सेवन करतात त्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाच्या अमि झोटा यांनी स्पष्ट केले. अशा व्यक्तींच्या शरीरात धोकादायक रसायने जातात. चाळीस टक्क्यांपर्यंत हे प्रमाण वाढते, असे अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता
researchers role in artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे उपयोग

लहान मुले व मोठय़ा व्यक्तींना आरोग्यविषयक गंभीर तक्रारींना तोंड द्यावे लागते. अन्न पदार्थ ज्या प्लास्टिक वेस्टनात ठेवले जातात, त्यातून धोकादायक रसायने मिसळतात. त्याचा धोका अधिक आहे. त्यासाठी संशोधनात ८,८७७ जणांनी प्रश्नावलीला उत्तरे दिली. त्यांना त्यांच्या दिवसभरातील आहाराबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यात आहाराबाबत विचारण्यात आले. त्यांचे लघवीचे नमुने घेण्यात आले. त्यामध्ये नि:सत्त्व आहार घेणाऱ्यांना अधिक धोका असल्याचे उघड झाले. त्या तुलनेत सात्त्विक आहार घेणाऱ्यांचे आरोग्य उत्तम असल्याचे त्यांच्या चाचणीतून आढळले.

ब्रेड, केक, पिझ्झा, नूडल्स यांसारख्या पदार्थातून हा धोका अधिक असतो, असे झोटा यांनी स्पष्ट केले.

प्लास्टिकमध्ये अन्नपदार्थ ठेवल्याने शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक स्थितीतही फरक पडतो, असे निदर्शनास आले आहे. विशेषत: मुलांमध्ये हा धोका अधिक असतो. जे लोक मांसाहारी सत्त्वहीन आहार (फास्ट फूड) घेतात त्यांच्यापेक्षा साधा आहार घेणाऱ्यांचे आरोग्य उत्तम आहे. हे निष्कर्ष पर्यावरण व आरोग्यविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)