नॉर्वेच्या संशोधकांचा सल्ला

ज्यांना उंच पर्वतावर गेल्यानंतर उंचीची भीती वाटते त्यांनी बिटाचा लाल रंगाचा रस जवळ ठेवावा, त्यामुळे त्यांची भीती कुठल्या कुठे पळून जाईल, असे संशोधकांचे मत आहे. उंचीवर गेल्यानंतर तेथे ऑक्सिजन कमी असतो, त्यामुळे काही लोकांना भीती वाटते. गिर्यारोहकांना नेहमी उंचीशी संबंधित या आजाराला तोंड द्यावे लागते. कमी ऑक्सिजन असताना शरीराला सक्षम ठेवणे अवघड असते त्याला अ‍ॅक्युट माउंटन सिकनेस असे म्हणतात. त्यावर मात करण्यासाठी उंच पर्वतावर जास्त काळ व्यतीत केला तर शरीराला कमी ऑक्सिजनमध्ये टिकून राहण्याची सवय लागते. बिटाचा रस जर आपण जवळ ठेवला व तो सेवन केला तर आपल्या शरीराला कमी ऑक्सिजनबरोबर जुळवून घेणे सोपे जाते.
वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, काठमांडू येथे रोलव्ॉलिग येथे ३७०० मीटर उंचीवरील ३९ दिवसांच्या मोहिमेत उंचीची भीती कमी करण्यासाठी बीट रसाचा प्रयोग करण्यात आला. आपल्या रक्तवाहिन्यांचे कार्य हे नैसर्गिक नायट्रिक ऑक्साईडवर अवलंबून असते. शरीरात नायट्रिक ऑक्साईड तयार होण्यासाठी आधी हवेत ऑक्सिजन जास्त प्रमाणात असणे आवश्यक असते. पर्वतांवर ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते, त्यामुळे रक्तवाहिन्यांचे काम नीट होत नाही.
बिटाच्या रसात नायट्रेटची मात्रा वाढवणारा एक घटक असतो, त्याचे रूपांतर शरीर नायट्रस ऑक्साईडमध्ये करू शकते. म्हणून बिटाचा रस उपयुक्त असतो. अगदी उंच ठिकाणी गेल्यास रक्तवाहिन्या आकुंचन पावतात असा अनुभव आहे. वैज्ञानिकांनी या संशोधनात आर्टियल एंडोथेलियल कार्याची चाचणी केली, त्यात अल्ट्रासाऊंडचा वापर केला जातो.
नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी व मिडस्वीडन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी असे दाखवून दिले की, सेंद्रिय बिटाच्या रसात नायट्रेट भरपूर असतात, त्यामुळे उंच गेल्यानंतरही रक्तवाहिन्यांचे कार्य व्यवस्थित राहते. २४ तासांच्या अंतराने या चाचण्या घेण्यात आल्या. बीटचा रस ज्यांनी सेवन केला होता त्यांच्या रक्तवाहिन्यांचे काम सुरळित दिसून आले.