उन्हाळा संपल्यावर प्रत्येकाला चाहूल लागते ती पावसाची. पावसाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभ राहतो छान हिरवगार निसर्ग. या पावसाळ्याच्या दिवसात मन अगदी प्रसन्न राहत. मात्र या दिवसात पावसाचा आनंद घेताना अनेक पावसाळी आजारांंनी डोक वर काढलेले असते. तुम्ही मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, सर्दी आणि खोकला, अतिसार यासारख्या अनेक आजारांना बळी पडू शकता. आजारी पडू नये याकरिता आपल्या आहारावर आणि आरोग्यावर विशेष लक्ष ठेवणे महत्वाचे आहे. ‘पोषणतज्ञ रुजुता दिवेकर’ यांनी अलीकडेच इन्स्टाग्रामवर “मान्सून फूड गाइड” ही पोस्ट शेअर केली असून या हंगामात काय खावे आणि काय खाऊ नये हे ठरविण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात रुजुता दिवेकर यांनी दिलेल्या या खास टिप्स.

आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा हे पदार्थ खावे.

* उकडलेले शेंगदाण्याचे आठवड्यातून दोन ते तीन वेळा सेवन करा.

* तुमच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा समावेश करा.

* तुमच्या आवडी नुसार तुम्ही मका  उकडून, भाजून किंवा मक्याचे दाणे हे सॅलडमध्ये टाकून त्याच सेवन करू शकता.

*दुधी, काकडी, भोपळा आणि इतर फळ भाज्यांच्या आहारात समावेश करा.

*सुरण, अरबी आणि इतर कंद  भाज्यांचा देखील नियमित आहारात समावेश करा.

आठवड्यातून एकदा तरी हे पदार्थ खावे.

* पावसाळ्याच्या या हंगामात तुम्ही बाजरी तसेच राजगिरा आणि शिंगाड्याच्या पीठांचा आहारात समावेश करा.

* पावसाळा सुरू झाला की अनेक रान भाज्या आणि बिनशेती भाज्या येत असतात. जस की अंबाडी व आळूची पाने अशा पावसाळी भाज्यांचा आहारात समावेश करा.

महिन्यातून किमान एकदा या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

* या हंगामात तुम्ही तुमच्या आहारात वाफावलेले मोदक तसेच खान्देशी स्पेशल बाफला आणि सिददू ( हिमाचल प्रदेशात प्रसिद्ध नाश्ता) यांचा समावेश करून महिन्यातून एकदा तरी सेवन करावे.

* पावसाळ्यात प्रत्येकजण पावसाचा आनंद घेण्यासाठी घरात भजी बनवून खात असतात. यासाठी तुम्ही भजीमध्ये घोसाळी, मायाळू, अजवाईन या पावसाळी भाज्यांच्या भजी पकोडे बनवून खाऊ शकता.

* पावसाच्या या दिवसात तुम्ही आहारात जंगली मशरूम आणि लिंगडी या भाज्यांंचा आहारात समावेश करा. त्याच बरोबर कवळ्या बांबूचे लोणचे देखील जेवणाबरोबर घेऊ शकता.

पावसाळ्याच्या हंगामात तुम्ही शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी व आरोग्य चांगले टिकवून ठेवण्यासाठी या पदार्थांचा तुमच्या पद्धतीने आहारात समावेश करा.