28 February 2021

News Flash

सगळ्यात बेस्ट डाएट कोणतं? जाणून घ्या या पाच प्रकारांविषयी

डाएट करण्यापूर्वी हे वाचा

वजन कमी करण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी आपण कायमच प्रयत्नशील असतो. त्यातूनच मग जीमला जाणं, योग करणं किंवा डाएट फॉलो करणं या गोष्टी ओघाओघाने येतात. मात्र, अनेकदा आपण कोणाकडून तरी ऐकून किंवा कोणाच्या तरी सल्ल्याने डाएट करत असतो. मात्र, तज्ज्ञांच्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही डाएट करणं चुकीचंच आहे. अनेक जण स्वत: च्या मनाने एखादं डाएट सुरु करतात, परंतु त्याचे होणारे परिणाम नेमके कसे असतील हे माहित नसतं. यामध्येत पाच डाएट प्रकार हे लोकांमध्ये विशेष लोकप्रिय असल्याचं दिसून येतं. त्यामुळे लोकप्रिय असलेले पाच डाएट प्रकार कोणते ते जाणून घेऊयात.

१. व्हेगन डाएट –

व्हेगन डाएटमध्ये फक्त वनस्पती-आधारित पदार्थ खावे लागतात. जे लोक या डाएटला फॉलो करतात ते मांस, डेअरी आणि अंडी या पदार्थांचा त्याच्या आहारात समावेश करत नाही. काही लोक मध देखील टाळतात. व्हेगन डाएटमुळे वजन कमी होण्यास मदत होते कारण मांसाहारी आहारात चरबी आणि कॅलरी जास्त असतात, म्हणून त्याऐवजी कमी-कॅलरीयुक्त वनस्पती-आधारित पदार्थांच सेवन केल्यास वजन व्यवस्थित राहू शकते. या डाएटमुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो असे मानले जाते. व्हेगन डाएट जोपर्यंत योग्य प्रकारे पाळले जाते तोपर्यंत ते निरोगी आणि फायदेशीर असते, याचा अर्थ प्रोटीन्ससाठी दररोज धान्य, डाळी आणि शेंगांवर भर टाकणे आवश्यक आहे, कारण जर प्रोटीन पुरेसे नसेल तर वजन कमी करण्यासाठी एखादं दुसरं डाएट पाळू शकतात कारण या डाएटमध्ये खाण्याच्या मर्यादा आहेत.

२. किटो डाएट –

किटो डाएटला कमी कार्ब डाएट म्हणून ओळखल जातं. इतर डाएटच्या तुलनेत हे लवकर वजन कमी करण्यास मदत करते, पचनप्रक्रिया वाढवते आणि भूक कमी करण्यास मदत करते. किटो डाएटमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. यालाच मधुमेहावरील रामबाण उपायदेखील म्हटलं जातं. किटो डाएट खूपवेळ फॉलो करायचे असेल तर, डॉक्टरांकडून याची परवानगी घेण गरजेच आहे. कारण यामुळे मूत्रपिंडात खडे, व्हिटॅमिन आणि खनिजांची कमतरत यासारख्या विविध समस्या उद्भवू शकतात. हे डाएट जर योग्य पद्धतीने फॉलो केलं नाही किंवा मध्येच सोडून दिले तर वजन मोठ्या प्रमाणात वाढू शकते. म्हणूनच हे डाएट सोडण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.

३.ग्लूटेन-फ्री डाएट –

आजकाल ग्लूटेन-फ्री डाएट लोकांमध्ये लोकप्रिय आहे. कारण यामुळे त्यांचे वजन कमी करण्यास मदत होते. अशा डाएटमुळे आपल्या आहारातील पौष्टिक पदार्थांमध्ये बदल होतो. या कारणासाठी, सगळ्यात आधी डायट्री न्युट्रीशिएनचा सल्ला घेतल्याशिवाय ग्लूटेन-फ्री डाएट सुरू करू नये. या डाएटमध्ये लोकांना फळे आणि भाज्यांचे सेवन वाढविण्यास सांगितले जाते. तसंच प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्यास बंदी असते. ग्लूटेन-फ्री आहाराचे पालन करण्यासाठी बऱ्याच मर्यादा असतात जसे की त्या व्यक्तीला ब्रेड, गोड आणि सॉस सारख्या साध्या पदार्थांचे सेवन करण्यास मनाई असते. तसेच, एकदा त्यांनी डाएट फॉले करणे बंद केले तर शरिरात जळजळ आणि वजन वाढवून शरीराला हानी पोहोचवते.

४. डिटॉक्स डाएट –

डिटॉक्सिफिकेशन ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे आपण आपल्या शरीरातून विषारी द्रव्य बाहेर काढतो. डिटॉक्स डाएटचे बरेच प्रकार आहेत, काहींमध्ये न खाणे आणि काही काळासाठी लिक्वीड डाएटचा समावेश आहे, तर काही आपल्याला केवळ कच्ची फळ आणि भाज्या खाण्यास सांगतात. परंतु, हे डाएट बंद केल्यावर वजन पुन्हा पूर्ववत होते. . दुसरीकडे, एखाद्या आठवड्यात एक डिटॉक्स दिवसाचा विचार करू शकतो. ज्यामुळे आपली त्वचा निरोगी आणि केसांची वाढ होते. शरीरात अँटीऑक्सिडेंट्स वाढवण्यास मदत होते.

५. इन्टरमिटेन्ट फास्टिंग –

इन्टरमिटेन्ट फास्टिंग म्हणजे अधून मधून उपवास करणे ही एक खाण्याची पद्धत आहे. या पद्धतीत, आठवड्यातून दोनदा दिवसातून १६ तास किंवा २४ तास उपवास केला जातो. हे वजन कमी करण्यास मदत करते, यामुळे मेंदूचे आरोग्य आणि हृदयाच्या आरोग्यास चालना आणि जळजळ कमी करण्यास मदत होते. उपवास करताना एखाद्याने स्वत: ला हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे आणि अशक्तपणा जाणवत असल्यास थांबावे, तीव्र डोकेदुखी येत असेल तर खाण्याच्या काळातही निरोगी आहार घेणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीचे आयुष्य सुधारण्यासाठी जीवनशैली बदलण्यासाठी या आहाराची शिफारस केली जाते.

हे जाणून घेणे महत्वाचे आहे की वजन कमी करण्यासाठी कोणतही डाएट योग्य नसते कारण वेगवेगळे डाएट शरीराच्या वेगवेगळ्या प्रकारांसाठी काम करतात. पाचही डाएट्समध्ये निरोगी आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. पाण्याचे पुरेसे सेवन, व्यायाम आणि तणावमुक्त झोप हे गरजेचे आहे. निरोगी, संतुलित आहार हा आपल्या पूर्वजांनी बर्‍याच वर्षांपासून केला आहे. आणि याचा फायदा आपल्याला खूप वेळ होतो. एकंदरीत सकाळचा नाष्टा हा राजासारखा असायला हवा, दुपारचे जेवण प्रजेसारख आणि रात्रीच जेवण हे भिकाऱ्यासारख असायल हवं. हे सगळ्यात फायदेशीर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 4:55 pm

Web Title: keto intermittent vegan detox diet types dcp 98 ssj 93
Next Stories
1 तापासंदर्भात द्विधा मन:स्थिती
2 सौंदर्यभान : डर्मारोलर उपचार
3 ताटामधील एक कोपरा पालेभाजीला द्या अन् फरक पाहा
Just Now!
X