29 November 2020

News Flash

Seltos ची जबरदस्त ‘क्रेझ’, सलग दुसऱ्या महिन्यात ठरली नंबर-1 SUV

एकीकडे मागणी वाढत असतानाच कंपनी या गाडीच्या किंमतीत वाढ करण्याचा विचार करतेय

दक्षिण कोरियाची ख्यातनाम कंपनी Kia Motors ने याच वर्षी भारतीय बाजारात पदार्पण केलं असून त्यांच्या Seltos या एसयूव्हीबाबत जबरदस्त क्रेझ दिसतंय. नोव्हेंबर महिन्यात ‘सेल्टॉस’च्या 14,005 युनिट्सची विक्री झाल्याचं समोर आलं असून यासोबतच विक्रीच्या बाबतीत ही गाडी एसयूव्ही प्रकरात सलग दुसऱ्या महिन्यात अव्वल ठरलीये.

Seltos ने ह्युंदाई क्रेटा, मारुती ब्रेझा आणि ह्युंदाई व्हेन्यू यांसारख्या लोकप्रिय एसयूव्हींना मागे टाकलंय. विशेष म्हणजे या गाडीच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. ऑगस्ट महिन्यापासून विक्री सुरू झालेल्या या गाडीच्या 7,754 युनिट्सची सप्टेंबर महिन्यात विक्री झाली होती. नंतर ऑक्टोबरमध्ये विक्रीमध्ये जवळपास 65 टक्क्यांची वाढ झाली आणि युनिट्सचा आकडा 12,854 वर गेला होता. तर आता नोव्हेंबर महिन्यात या गाडीच्या मागणीत अजून वाढ झाली असून 14,005 युनिट्सची विक्री झाली आहे.

एकीकडे मागणी वाढत असतानाच कंपनी या गाडीच्या किंमतीत वाढ करण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे. सध्या या गाडीच्या विविध व्हेरिअंट्सची किंमत 9.69 ते 16.99(एक्स शोरुम) लाख रुपयांदरम्यान आहे. एक जानेवारीपासून या गाडीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 31 डिसेंबरनंतर डिलिव्हर होणाऱ्या गाड्यांवर नव्या किंमती लागू होतील.

आणखी वाचा – Hyundai Venue चा जलवा; आफ्रिकेतही निर्यात, बुकिंग एक लाखांपार

कशी आहे सेल्टॉस –

9.69 लाख ते 15.99 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरुम) या बहुप्रतिक्षित कारच्या विविध व्हेरिअंट्सची किंमत ठरवण्यात आली आहे. दोन डिझाइनच्या पर्यायांसह ही कार भारतीय बाजारात उतरवण्यात आली असून बाजारात या कारची एमजी हेक्टर, टाटा हॅरियर आणि ह्युंडई क्रेटा यांसारख्या एसयूव्हीशी स्पर्धा असेल. विविध सात रंगांच्या पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध आहे. टेक लाइन आणि जीटी लाइन अशा दोन डिझाइनमध्ये ही कार लाँच करण्यात आली आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारात एखादं मॉडल दोन डिझाइनच्या पर्यायांसह लाँच केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. टेक लाइन अधिक प्रीमियम आणि फॅमिली-ओरिएंटेड स्टायलिंग पॅकेजसह आहे. तर, जीटी लाइनची स्टाइल स्पोर्टी आहे. याद्वारे तरुणांना आकर्षित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. टेक लाइनमध्ये पाच व्हेरिअंट आणि जीटी लाइनमध्ये तीन व्हेरिअंटचे पर्याय उपलब्ध आहेत.

किआ सेल्टॉसच्या इंजिनचे तीन पर्याय आहेत. यामध्ये 1.4-लिटर पेट्रोल टर्बोचार्ज्ड, 1.5-लिटर पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिनचा समावेश आहे. सर्व इंजिन ‘भारत स्टेज 6’ (बीएस 6) मानकांनुसार आहेत. ह्युंडई क्रेटासारख्या प्लॅटफॉर्मवर Seltos आधारीत आहे. तुलनेने सेल्टोस नक्कीच थोडीफार मोठी आहे. 1.5-लिटरच्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन स्टँडर्ड असून दोन्ही इंजिनमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय देखील उपलब्ध आहे. 1.4-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिनसह 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रांसमिशनचा पर्याय आहे.

आणखी वाचा – ‘मारुती’ची ऐतिहासिक झेप, ओलांडला मैलाचा दगड

कनेक्टेड कार –
ही कनेक्टेड कार आहे. यामध्ये UVO Connect नावाची एक कनेक्टिव्हिटी सिस्टिम आहे. यात नेव्हिगेशन, सेफ्टी-सिक्युरिटी, व्हेइकल मॅनेजमेंट, रिमोट कंट्रोल आणि कनव्हिनियन्स या 5 श्रेणीअंतर्गत 37 फीचर्स देण्यात आलेत. अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार-प्ले आणि नेव्हिगेशनसह 10.25 इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टिम, 8-स्पीकर साउंड सिस्टिम, एअर प्यूरिफायरसाठी रिमोट कंट्रोल, रिमोट इंजिन स्टार्ट-स्टॉप, व्हेइकल ट्रॅकिंग, व्हॉइस कमांड, 8-स्पीकर साउंड सिस्टिम, 360 डिग्री सराउंड कॅमेरा, 6-एअरबॅग, एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, व्हेइकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट, हिल स्टार्ट असिस्ट, फ्रंट व रिअर पार्किंग सेंसर्स आणि ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर यांसारखे फीचर्स आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 9:52 am

Web Title: kia india sells 14005 units of the seltos in november 2019 sas 89
Next Stories
1 आठ फेरे घेत बबिता फोगट अडकली विवाहबंधनात
2 Viral Video : प्रेयसीचा पती घरी येताच चौथ्या मजल्यावर तो विवस्त्र लटकला; अन्…
3 Video : वाचावं ते नवलंच! या घोड्याला लागतो ‘मॉर्निंग टी’
Just Now!
X