याच वर्षी भारतात पदार्पण करणारी दक्षिण कोरियाची ख्यातनाम कंपनी Kia Motors बाबत चांगलंच क्रेझ असल्याचं दिसतंय. ऑक्टोबर महिन्यातील विक्रीच्या मार्केट शेअरमध्ये टॉप 10 कार्सच्या यादीत किया मोटर्सने सातवं स्थान मिळवलंय. ‘सेल्टॉस’च्या बळावर लाँच झाल्यापासून तीन महिन्यांमध्येच कंपनीने अनेक दिग्गज कंपन्यांना मागे टाकलंय. एकीकडे देशात ऑटोमोबाइल क्षेत्रात मंदी असताना किया मोटर्सने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सध्या भारतीय बाजारात केवळ सेल्टोस ही किया मोटर्सची एकमेव कार आहे. ऑक्टोबरमध्ये एकूण 12,854 सेल्टॉसची विक्री झाली आहे. सेल्टॉसची क्रेझ आगामी काळातही कायम राहण्याची शक्यता इंडस्ट्रीमधील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कारण, यापूर्वीच कंपनीला जवळपास 60,000 सेल्टॉसची बुकिंग मिळाली आहे. यातील 26 हजार 640 गाड्यांची लवकरच डिलिव्हरीही केली जाणार आहे. किया मोटर्सशिवाय भारतीय बाजारात पदार्पण करणाऱ्या MG Motors ने देखील दमदार प्रदर्शन केलंय. ऑक्टोबरमध्ये 3,536 हेक्टर विकल्या गेल्यात. सर्वाधिक विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकीच्या Dzire ने आपला दबदबा कायम ठेवला असून अव्वल क्रमांक गाठलाय.

narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
BMW iX xDrive50 launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, नवी इलेक्ट्रिक SUV देशात दाखल, सिंगल चार्जमध्ये धावते ६३५ किमी, पण किंमत तर…
Top Companies, Lose, Rs 1.97 Lakh Crore , market valuation, infosys, tcs, hdfc bank, hindustan unilever, finance, financial knowledge, financial year end,
आघाडीच्या १० कंपन्यांपैकी पाच कंपन्यांना बाजारभांडवलात १.९७ लाख कोटींची घट

कशी आहे सेल्टॉस –

9.69 लाख ते 15.99 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरुम) या बहुप्रतिक्षित कारच्या विविध व्हेरिअंट्सची किंमत ठरवण्यात आली आहे. दोन डिझाइनच्या पर्यायांसह ही कार भारतीय बाजारात उतरवण्यात आली असून बाजारात या कारची एमजी हेक्टर, टाटा हॅरियर आणि ह्युंडई क्रेटा यांसारख्या एसयूव्हीशी स्पर्धा असेल. विविध सात रंगांच्या पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध आहे. टेक लाइन आणि जीटी लाइन अशा दोन डिझाइनमध्ये ही कार लाँच करण्यात आली आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारात एखादं मॉडल दोन डिझाइनच्या पर्यायांसह लाँच केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. टेक लाइन अधिक प्रीमियम आणि फॅमिली-ओरिएंटेड स्टायलिंग पॅकेजसह आहे. तर, जीटी लाइनची स्टाइल स्पोर्टी आहे. याद्वारे तरुणांना आकर्षित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. टेक लाइनमध्ये पाच व्हेरिअंट आणि जीटी लाइनमध्ये तीन व्हेरिअंटचे पर्याय उपलब्ध आहेत.

किआ सेल्टॉसच्या इंजिनचे तीन पर्याय आहेत. यामध्ये 1.4-लिटर पेट्रोल टर्बोचार्ज्ड, 1.5-लिटर पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिनचा समावेश आहे. सर्व इंजिन ‘भारत स्टेज 6’ (बीएस 6) मानकांनुसार आहेत. ह्युंडई क्रेटासारख्या प्लॅटफॉर्मवर Seltos आधारीत आहे. तुलनेने सेल्टोस नक्कीच थोडीफार मोठी आहे. 1.5-लिटरच्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन स्टँडर्ड असून दोन्ही इंजिनमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय देखील उपलब्ध आहे. 1.4-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिनसह 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रांसमिशनचा पर्याय आहे.

कनेक्टेड कार –
ही कनेक्टेड कार आहे. यामध्ये UVO Connect नावाची एक कनेक्टिव्हिटी सिस्टिम आहे. यात नेव्हिगेशन, सेफ्टी-सिक्युरिटी, व्हेइकल मॅनेजमेंट, रिमोट कंट्रोल आणि कनव्हिनियन्स या 5 श्रेणीअंतर्गत 37 फीचर्स देण्यात आलेत. अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार-प्ले आणि नेव्हिगेशनसह 10.25 इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टिम, 8-स्पीकर साउंड सिस्टिम, एअर प्यूरिफायरसाठी रिमोट कंट्रोल, रिमोट इंजिन स्टार्ट-स्टॉप, व्हेइकल ट्रॅकिंग, व्हॉइस कमांड, 8-स्पीकर साउंड सिस्टिम, 360 डिग्री सराउंड कॅमेरा, 6-एअरबॅग, एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, व्हेइकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट, हिल स्टार्ट असिस्ट, फ्रंट व रिअर पार्किंग सेंसर्स आणि ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर यांसारखे फीचर्स आहेत.