17 August 2019

News Flash

Kia Seltos चा ‘जलवा’, एकाच दिवसात बुकिंग 6 हजारापार

Kia Motors च्या बहुचर्चित Seltos एसयूव्ही या नव्या कारला जबरदस्त प्रतिसाद

Kia Motors च्या बहुचर्चित Seltos एसयूव्ही या नव्या कारला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. 16 जुलैपासून या कारच्या बुकिंगसाठी कंपनीने सुरूवात केली असून केवळ एकाच दिवसात 6 हजाराहून अधिक जणांनी या कारसाठी बुकिंग केल्याची माहिती कंपनीने दिली आहे. पहिल्याच दिवशी 6 हजार 46 युनिट्सची बुकिंग झाली, यातील 1628 युनिट्सची विक्री कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.  25 हजार रुपयांमध्ये या कारसाठी आगाऊ नोंदणी सुरू आहे.  त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत ही कार ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाईल. ह्युंडई व्हेन्यू आणि एमजी हेक्टर प्रमाणेच ही देखील अनेक आकर्षक फीचर्स असलेली एक कनेक्टेड कार असून बरीच चर्चेत आहे.

10-17 लाख रुपये किंमत?  

ह्युंडई क्रेटासारख्या प्लॅटफॉर्मवर  Seltos आधारीत आहे. तुलनेने सेल्टोस नक्कीच थोडीफार मोठी आहे. 10 ते 17 लाख (एक्स-शोरूम किंमत) रुपयांच्या दरम्यान या कारची किंमत असू शकते. तर ऑन-रोड किंमत 12.20 लाख ते 19.7 लाख रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात या कॉम्पॅक्ट SUV ची स्पर्धा टाटा हॅरियर, MG Hector आणि जीप कंपस यांसारख्या गाड्यांशी असेल.

कंपनीचे देशभरात एकूण 265 टचपॉइंट्स असतील, याद्वारे देशात सर्वत्र ही कार विक्रीसाठी उपलब्ध असेल. ‘किआ मोटर्स’च्या या एसयूव्हीमध्ये इंजिनसाठी तीन पर्याय असतील. यातील एक 1.4-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल, दूसरं 1.5-लिटर पेट्रोल आणि तिसरं 1.5-लिटर डिझेल इंजिन असेल. सर्व इंजिन ‘भारत स्टेज 6’ (बीएस 6) मानकांनुसार असतील. 1.5-लिटरच्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन स्टँडर्ड असून दोन्ही इंजिनमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय देखील उपलब्ध आहे. 1.4-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिनसह 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रांसमिशनचा पर्याय आहे.

कनेक्टेड कार –
ही कनेक्टेड कार आहे. यामध्ये UVO Connect नावाची एक कनेक्टिव्हिटी सिस्टिम आहे. यात नेव्हिगेशन, सेफ्टी-सिक्युरिटी, व्हेइकल मॅनेजमेंट, रिमोट कंट्रोल आणि कनव्हिनियन्स या 5 श्रेणीअंतर्गत 37 फीचर्स देण्यात आलेत. अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार-प्ले आणि नेव्हिगेशनसह 10.25 इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टिम, 8-स्पीकर साउंड सिस्टिम, एअर प्यूरिफायरसाठी रिमोट कंट्रोल, रिमोट इंजिन स्टार्ट-स्टॉप, व्हेइकल ट्रॅकिंग, व्हॉइस कमांड, 8-स्पीकर साउंड सिस्टिम, 360 डिग्री सराउंड कॅमेरा, 6-एअरबॅग, एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, व्हेइकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट, हिल स्टार्ट असिस्ट, फ्रंट व रिअर पार्किंग सेंसर्स आणि ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर यांसारखे फीचर्स आहेत.

First Published on July 18, 2019 1:12 pm

Web Title: kia motors seltos suv booking crosses 6 thousand in just one day sas 89