27 February 2021

News Flash

पहिली ‘मेड इन इंडिया’ कार लाँच करणार Kia Motors, आंध्रच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

Seltos आधीच 'मेड इन इंडिया' कार लाँच करणार, 536 एकरच्या प्लांटमध्ये 300 हून अधिक रोबोट्स करतायेत काम

दक्षिण कोरियाची ख्यातनाम कार निर्माती कंपनी Kia Motors ने भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात शानदार पदार्पण केलंय. त्यांची बहुचर्चित Seltos एसयूव्ही 22 ऑगस्ट रोजी भारतात लाँच होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच 8 ऑगस्ट रोजी ‘मेड इन इंडिया’ कार लाँच करण्याच्या तयारीत कंपनी आहे.

8 ऑगस्ट रोजी कंपनीने एका इव्हेंटचं आयोजन केलं असून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना निमंत्रण दिलं आहे. येथील अनंतपुरम जिल्ह्यात 536 एकर परिसरात कंपनीने पहिला प्लांट उभारलाय. या प्लांटमध्ये 1.1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक कंपनीने केली आहे. दरवर्षी येथे 3 लाख कारची निर्मिती केली जाईल. कंपनीने यावर्षी जानेवारी महिन्यातच आपल्या कन्सेप्ट कारचं उत्पादन सुरू केलं होतं. या प्लांटमध्ये कार उत्पादनासाठी कंपनीकडून आधुनिक अशा आर्टिफिशिअल तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, शिवाय प्लांटमध्ये 300 हून अधिक रोबोट्सदेखील असून कार उत्पादनासाठी त्यांचाही उपयोग केला जात आहे.

यानंतर कंपनी त्यांची बहुचर्चित Seltos एसयूव्ही 22 ऑगस्ट रोजी भारतात लाँच करणार आहे. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी 25 हजार रुपयांमध्ये 16 जुलैपासून आगाऊ नोंदणी सुरू झालीये. ह्युंडई व्हेन्यू आणि एमजी हेक्टर प्रमाणेच ही देखील अनेक आकर्षक फीचर्स असलेली एक कनेक्टेड कार असून बरीच चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 12:56 pm

Web Title: kia motors to launch made in india car on august 8 sas 89
Next Stories
1 Good News : महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागात ५०० इंजिनीअर्सची भरती
2 दिवाळीपूर्वी भारतात लाँच होणार या 5 शानदार कार्स
3 Redmi K20-K20 Proचा फ्लॅशसेल, ‘या’ आहेत ऑफर्स
Just Now!
X