21 October 2020

News Flash

Kia Sonet च्या प्री-बुकिंगला झाली सुरूवात, मिळतील 55 कनेक्टेड फीचर्स

सोनेटमध्येही सेल्टॉसप्रमाणे UVO कनेक्टेड टेक्नोलॉजी

दक्षिण कोरियाच्या किया मोटर्सने या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच (दि. 7 ऑगस्ट) भारतीय बाजारात आपली बहुप्रतिक्षित कॉम्पॅक्ट एसयूव्ही Kia Sonet सादर केली होती. आता 20 ऑगस्ट अर्थात आजपासून या गाडीसाठी कंपनीने प्री-बुकिंग घेण्यास सुरूवात केली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा किया मोटर्सच्या डीलरशिपमध्ये ग्राहक 25,000 रुपयांमध्ये ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही बूक करु शकतात. किया सोनेट भारतीय मार्केटमध्ये ह्युंडाई व्हेन्यू, मारुती सुझुकी ब्रिझा, Tata Nexon, महिंद्रा एक्सयूव्ही 300, फोर्ड इकोस्पोर्ट या गाड्यांना टक्कर देईल.

(क्रेटा-सेल्टॉसच्या Turbo पेक्षा 5 लाखांनी ‘स्वस्त’! लाँच झाली ‘पॉवरफुल’ Renault Duster Turbo)

55 कनेक्टेड फीचर्स :-
कंपनीने सोनेट ही एक कनेक्टेड कार म्हणून सादर केली आहे. यात iMT आणि व्हायरस प्रोटेक्शनसारखे हाईटेक फीचर्स आहेत. या कारला खास भारतासाठी डिझाईन केल्याचे कंपनीने म्हटले आहे. सोनेटमध्येही सेल्टॉसप्रमाणे UVO कनेक्टेड टेक्नोलॉजी आहे. याद्वारे अनेक कनेक्टेड फीचर्स मिळतात. किया सोनेटमध्ये 55 कनेक्टेड फीचर्स असतील असा कंपनीचा दावा आहे. कियाने ही एसयूव्ही इंजिनच्या तीन प्रकारांमध्ये सादर केली आहे. यातील दोन पेट्रोल इंजिन (1.2 लिटर आणि 1.0 लीटर टर्बो जीडीआय) आहेत. तर, तिसरं डिझेल इंजिन( 1.5 लिटर टर्बो) असेल.

( OFFER : देशातील सर्वात स्वस्त फॅमिली कार अजून स्वस्तात खरेदी करण्याची संधी)

भारतातून होणार एक्स्पोर्ट :-
आंध्र प्रदेशच्या अनंतपुर येथील प्लांटमध्ये किया सोनेट मॅन्युफॅक्चर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे इथूनच ही कार जगभरातील अन्य देशांमध्ये एक्स्पोर्ट केली जाणार आहे. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये 5 स्पीड मॅन्युअल, सिक्स स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड AT आणि 6 स्पीड iMT चे पर्याय मिळतील. कंपनीने या गाडीमध्ये 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेंन्मेंट सिस्टिम दिली आहे. या सिस्टिमला अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कार-प्लेचा सपोर्ट असेल. तसेच, Bose 7 स्पीकर सिस्टिम, इलेक्ट्रिक सनरूफ, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स आहेत. ही कनेक्टेड कार स्मार्टवॉचद्वारे आणि स्मार्टफोनद्वारेही कनेक्ट करता येते. वायरलेस चार्जिंगचं फीचरही यामध्ये आहे. सुरक्षेसाठी Kia मोटर्सच्या या एसयूव्हीमध्ये शानदार फीचर्स आहेत. यात 6 एअरबॅग, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम (TPMS), ऑटो हेडलाइट, ब्रेक असिस्ट (BA), इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC) यांसारखे अनेक दमदार फीचर्स आहेत. Kia Motors ने याआधी भारतात Kia Seltos आणि Kia Carnival या दोन गाड्या लाँच केल्या आहेत. तर, Kia Sonet ही कंपनीची तिसरी कार ठरली आहे. कंपनीची सेल्टॉस ही एसयूव्ही भारतातील पदार्पणातच प्रचंड लोकप्रिय ठरली होती.

(Scorpio, बोलेरो… ! महिंद्राच्या SUV वर तीन लाखांपर्यंत बंपर डिस्काउंट)

किती असू शकते किंमत :-
Sonet च्या किंमतीचा खुलासा अद्याप कंपनीने केलेला नाही. पण, 6.5 लाख ते 12 लाख रुपयांदरम्यान या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची एक्स-शोरुम किंमत असण्याची शक्यता आहे. लवकरच आगामी सणासुदीच्या काळात कंपनी ही एसयूव्ही लाँच करणार आहे. त्याचवेळी किंमतीचीही घोषणा केली जाईल.

(क्रेटा-सेल्टॉसच्या Turbo पेक्षा 5 लाखांनी ‘स्वस्त’! लाँच झाली ‘पॉवरफुल’ Renault Duster Turbo)

( ‘या’ SUV ची जबरदस्त ‘क्रेझ’, बूकिंग नव्हे तर विक्रीचा आकडा तब्बल 5 लाखांपार)

(Mahindra ने दिली ‘गुड न्यूज’! स्वस्त झाली दमदार SUV, किंमतीत घसघशीत कपात)

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 2:05 pm

Web Title: kia sonet bookings now open officially check specifications expected price and other details sas 89
Next Stories
1 भारतासह अनेक देशांमध्ये डाउन झालं Gmail , ई-मेल सेंड होत नसल्याने युजर्स त्रस्त
2 6GB रॅम असलेल्या Realme च्या ‘बजेट’ स्मार्टफोनचा सेल, शानदार ऑफर्सही
3 पाच कॅमेऱ्यांचा ‘बजेट’ स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी, फोनमध्ये आहे 5,020mAh ची दमदार बॅटरीही
Just Now!
X