मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णाला डायलिसिसवर ठेवल्यास त्याला लवकर मृत्यू येण्याचा धोका आहे. यात विशेषत: हृदय अथवा रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळय़ा होण्याचा धोका असल्याचा इशारा एका नव्या अभ्यासामध्ये देण्यात आला आहे.

डायलिसिसमुळे रक्ताच्या गुठळय़ांसह रक्तस्राव होण्यास सुरुवात होत असल्याचे संशोधकांना दिसून आले. जर्मनीतील आरडब्ल्यूटीएच आकेन युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी १७१ तीव्र डायलिसिस असलेल्या रुग्णांच्या रक्ताचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांच्या तुलनेत इतर रुग्णांच्या रक्तांमधील गुठळीची घनता ही जास्त असल्याचे यात दिसून आले.

Mumbai, accident death, uncle, negligence, Nephew
मुंबई : पुतण्याचा निष्काळजीपणा काकाच्या जीवावर बेतला
Worker dies due to suffocation in sewage tank
वसई : सांडपाण्याच्या टाकीत गुदमरून कामगाराचा मृत्यू
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक

याच्या व्यतिरिक्त कमी गुठळय़ा असलेल्या रुग्णामध्ये हृदय अथवा रक्तवाहिन्यांसंबंधी तसेच इतर कारणांमुळे मृत्यू येण्याचा धोका जास्त असल्याचे संशोधकांनी सांगितले. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत फायब्रिनोजेन प्रथिनांचे रूपांतर फायब्रिन प्रथिनांत होते. मात्र मूत्रपिंड निकामी झालेल्यामध्ये ही प्रक्रिया काहीशी विसंगत आढळून आल्याचे संशोधकांनी माहिती देताना सांगितले.

यावर उपचार करताना अधिक चांगल्या पद्धतीचे डायलिसिस आवश्यक असून रक्त गोठण्याच्या प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी भविष्यात अधिक संशोधन करणे आवश्यक असल्याचे आकेन विद्यापीठातील कॅथारिना सॅच्यूट यांनी सांगितले. हे संशोधन ‘अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी’ नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)