शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, ऍलर्जी आणि अस्थमा असणाऱया मुलांच्या वागणूकीतील सक्रीयता नष्ट होते. या मानसिक निष्क्रियतेला एडीएचडी विकार असे संबोधतात.
त्यानुसार कोणत्याही प्रकारची ऍलर्जी किंवा अस्थमामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.       
त्याचबरोबर या मानसिक निष्क्रियतेचे प्रमाण मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहे. कारण, अस्थमा होण्याचे प्रमाण मुलींपेक्षा मुलांमध्ये जास्त आहे. असे शास्त्रज्ञ इल्को हाक यांनी केलेल्या परीक्षणात म्हटले आहे. नेदरलँड व बोस्टन येथील संशोधकांनी एकूण ८८४ एडीएचडी बाधित मुलांचे परीक्षण केले. त्यातील ३४ टक्के मुलांना अस्तमा, तर ३५ टक्के मुलांना ऍलर्जीचा त्रास असल्याचे आढळून आले आहे.