Kiwi For Skin : त्वचेला नैसर्गिक पद्धतीनं तजेलदार करण्यासाठी विविध ब्यूटी प्रोड्क्ट्स (Beauty Products) असावं असा नियम नाही. त्वचेसाठी नैसर्गिक पद्धतीचा वापर करणे कधीही चांगलेच. यासाठी अतिशय मधुर आणि रसाळ किवी फळ फायद्याचं आहे. या फळात मोठ्या प्रमाणात फायबर (Fiber) असते जे त्वचेसाठी फायद्याचं ठरेल. जाणून घेऊयात शरिरासाठी किवी फळ कसं फायद्याचं ठरतेय….

सर्वांनाच वाटते की आपली त्वचा चमकदार आणि तरुण राहावी. पण हे सर्वासांठी शक्य नाही. किवीचा वापर केल्याने तुमच्या शरिरावरील एंटी एजिंग लक्षणांना दूर करते. काळा डाक, सुरकत्या यासारख्या समस्या क्षणात नाहिशा होतात. प्रखर सुर्याची किरणे आणि प्रदुषित हवा यामुळे त्वचा निस्तेज होऊ लागते. किवीमध्ये असणाऱ्या विटॅमीन ई मुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते. किवी फळांमध्ये विटॅमीन सी आहे, जे आपल्या त्वचेसाठी फायद्याचे आहे. किवी फळामध्ये मोठ्या प्रमाणात एण्टी बॅक्टीरियल (antibacterial) तत्वेही आहेत. जे पिंपल्स आणि एक्ने झटक्यात नाहिसे करतात.

किवी फळांचा पेस पॅक कसा कराल :

तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी किवी आणि लिंबाच्या रसाचा फेसपॅक फायद्याचा ठरु शकतो. यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा किवी पल्प घ्या. हे मिश्रण चांगलं करा. त्यानंतर चेहरा आणि गळ्याला लावा.

कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठी किवी फळ, केळी आणि दही यांचा फेसपॅक फायदाचा ठरेल. तुमची त्वचा यामुळे उजळण्यास मदत होईल. एका फांड्यात किवी पल्प घ्या. त्यानंतर मॅश केलेले केळी आणि एक चमचा दही घ्या. या तिन्ही पदार्थाचं चांगलं मिश्रण करा. हे मिश्रण ३० मिनिटांपर्यंत चेहऱ्याला आणि गळ्याला लावा. सुखल्यानंतर स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या…

चेहरा फ्रेश ठेवण्यासाठी एका भांड्यात किवी पल्प आणि बादाम पेस्ट घ्या. त्यामध्ये थोड्या प्रमाणात बेसन मिसळा. याच चांगलं मिश्रण करा. हे आपल्या चेहऱ्याला आणि गळ्याला लावा. १५ मिनिटांनंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवून घ्या…

चेहऱ्यावरील काळे डाग, सुरकत्या आणि एक्ने दूर करण्यासाठी किवीला ऑलिव ऑइल आणि अंड्यामध्ये मिसळा. यामुळे तुमची त्वचा डल राहणार नाही. एका भांड्यात किवीचा पल्प, अंड्याचा बलक आणि ऑलिव ऑइल घ्या आणि चांगलं मिश्रण करा… चेहऱ्यावर लावल्यानंतर १५ मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा…

 

निस्तेज त्वचा पुन्हा ताजीतवानी करण्यासाठी किवीचा फेसपॅक चांगलाच फायद्याचा ठरु शकतो. यासाठी कीवी पल्प आणि ऑलिव ऑइल समप्रमाणात घ्या. दोन्हीचं चांगलं मिश्रण करा… त्यानंतर चेहऱ्याला आणि गळ्याला लावा.. त्यानंतर आपल्या बोटांनी हळुवार मसाज करा…

लक्षात ठेवा.. वरीलपैकी कोणत्याही फेसपॅकचा वापर करण्यापूर्वी चेहऱ्याची पॅच टेस्ट करुन घ्या.. जेणेकरुन तुम्हाला कोणता फेसपॅक वापरता येईल हे लक्षात येईल आणि कोणत्या फेसपॅकचा चेहऱ्यावर चुकीचा परिणाण होऊ शकतो…