आरोग्यासाठी फळे ही सर्वात उत्तम हे आता सर्वानीच मान्य केले आहे. आंबा, सफरचंद, संत्री, केळी, किलगड अशा आपल्याकडच्या फळांचे गुण सर्वसाधारणपणे माहिती असतात. मात्र गेल्या काही वर्षांत थायलंड- मलेशिया-चीनवरून येत असलेल्या विदेशी फळांनी बाजारात लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आहे. ही फळे कोणी खावी, कोणी खाऊ नये याविषयी अनेकांच्या मनात शंका असतात. त्यांचे निरसन करण्याचा हा प्रयत्न….पाहूयात किवीचं फळ खाण्याचे फायदे काय आहेत…

किवी हे फळ मूळ चीनमधील आहे. न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी किवीच्या तपकिरी रंगाशी साम्य असल्याने या फळाचे नाव किवी ठेवण्यात आले. न्यूझीलंड, फ्रान्स, इटली, जपान व अमेरिकामध्ये या फळांची जास्त लागवड होते. आता भारतातही उत्तर व ईशान्येकडील भारतातील राज्यात लागवड करून निर्यातही केली जाते. साधारणत ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत किवीचा हंगाम असतो. हिरव्या रंगाच्या किवीला थोडेसे गोड, आंबट, आम्लयुक्त अशी मजेशीर चव लागते. हे फळ छोटे आणि अंडाकृती असते. त्वचा अस्पष्ट तपकिरी रंगी आणि अर्धपारदर्शक असते. आतून हिरवट द्रव असलेल्या गरामध्ये पांढऱ्या पेशींची जुळवाजुळव आढळते व काळ्या रंगाच्या खाण्यायोग्य बिया असतात.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
mouthwash
श्वासाच्या दुर्गंधीपासून सुटका हवीये? मग घरी बनवलेल्या माउथवॉशने करा गुळण्या, तुमचा श्वास नेहमी राहील ताजा

कोणी खावे ?
किवीमध्ये ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे व शरीरातील कमकुवत पेशींना सुदृढ बनवण्याचे काम करते, तसेच शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. संधिवात , आमवात, दमा यासारख्या रोगांवर किवी हे फळ गुणकारी ठरते . ह्या फळामध्ये तंतूचे प्रमाण अधिक असल्याने मधुमेहींसाठीही उपयोगी ठरते. किवीमध्ये नैसर्गिकरित्या रक्त पातळ कमी करण्याचे गुणधर्म असल्याने कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असलेल्या, तसेच हृदयविकार असणाऱ्यांसाठी हे फळ उपयुक्त आहे. पाणी व पोटॅशियम अधिक असल्याने लघवीच्या जागेवर खाज येत असल्यास किवा जळजळ होत असल्यास किवी खाल्ल्याने फायदा होतो. किवीत ‘के’ जीवनसत्त्व असल्याने फळाचा गर एखाद्या चटका लागलेल्या भागावर लावल्यास जखम लवकर भरून येते. पचन नीट होण्यास हे फळ मदत करते

कोणी खाऊ नये ?
पित्ताशय व मूत्रपिंडांशी संबंधित आजार असलेल्यांनी फळ खाणे टाळावे. काही लोकांना किवीची अ‍ॅलर्जी असू शकते. तोंडाला खाज येते.