28 September 2020

News Flash

सणासुदीच्या काळात सोने खरेदी करावी का?

जाणून घ्या जागतिक स्तरावरील आर्थिक गणिते आणि त्याचा सोन्याच्या किमतीवर होणारा परिणाम

सणासुदीच्या काळात सोन्याच्या किमती सहसा वाढतात. परंतु, यावेळी रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे दागिन्यांची विक्री संथ होणे अपेक्षित आहे. रुपया-डॉलरच्या समीकरणाचा सहसा सोन्याच्या जागतिक किमतीवर परिणाम होत नाही. परंतु भारतामध्ये सोन्याची मोठ्या प्रमाणावर आयात होत असल्यामुळे, देशांतर्गत किमती उसळतात. अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध, खनिज तेलाच्या चढ्या किमती आणि इराणकडून खनिज तेल आयात करण्याबाबत भारताची द्विधा मनस्थिती ही डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होण्याची प्राथमिक कारणे आहेत. रुपया-डॉलरचे हे समीकरण इतक्यात बदलण्याची शक्यता धूसर आहे.

अशावेळी सोने खरेदी करावे का?

नजीकच्या भविष्यात अमेरिका आणि चीनमध्ये जोरदार व्यापार युद्ध होण्याच्या भितीमुळे सोन्याची मागणी आणि ओघाने किमती वाढल्या आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सोन्याच्या किमतीच्या व्यस्त प्रमाणात आहे. एक उदाहरण घेऊन हे समजावून घेऊ या. समजा, १ डॉलर म्हणजे ७० रुपये असेल सोन्याची आयात किंमत ही सर्व शुल्कांसह १२००डॉलर/औंस (१ औंस = २८.३५ ग्रॅम्स) आहे. तर सोन्याची भारतातील किंमत ही साधारण २९६३ रुपये/ग्रॅम (1 औंस = 28.35 ग्रॅम्स) असेल. जर चलनाचे मूल्य बदलून डॉलरमागे ते ७५ रुपये झाले आणि सोन्याची आयात स्थिर राहिली तर भारतात सोन्याची नवीन किंमत वाढून एका ग्रॅमसाठी ३१७४ रुपये होईल. एकूण काय तर मागच्या काही काळात सोन्याची किंमत वाढत असल्याने त्याची खरेदी करणे फायद्याचे ठरणार आहे.

आंतरराष्ट्रीय खनिज तेलाची किंमत हा एक प्रमुख घटक आहे ज्याचा अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या अस्थिर मूल्यावर परिणाम होतो. सध्या भारताने इराणकडून खनिज तेल आयात न करण्याबाबत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर दबाव आणला जात आहे. जर भारताने इराणकडून खनिज तेल आयात करणे थांबवले तर, त्यामुळे आयात बिलाला मोठा झटका बसेल आणि रुपया कोसळेल. दुसरीकडे, जर भारताने इराणकडून आयात चालू ठेवली तर, अमेरिकेकडून होणाऱ्या दंडामुळे भारतीय रुपयाचे आणखी अवमूल्यन होईल. त्यामुळेस भारत सध्या कॅच-22 परिस्थितीमध्ये अडकला असून रुपया सावरण्याची शक्यता भविष्यात अवघड आहे. त्यामुळे, सणासुदीच्या दिवसांत अल्पकालीन गुंतवणूक म्हणून सोने खरेदीची कल्पना चांगली आहे.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2018 7:49 pm

Web Title: know about is it a good time to buy gold
Next Stories
1 ATM मधून एका दिवसात किती पैसे काढता येणार?, जाणून घ्या सर्व बँकांची मर्यादा
2 १४९ रुपयांमध्ये आयडीया देणार ३३ जीबी डेटा
3 International Coffee Day : जाणून घ्या कॉफीच्या शोधाची रंजक गोष्ट
Just Now!
X