गेल्या काही दिवसांमध्ये Reliance Jio ने आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये अनेक बदल केलेत. या महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या टॅरिफ दरवाढीमुळे आता जिओचे प्रीपेड प्लॅन 40% महागलेत. प्लॅन महाग झाले असले तरीही युजर्सना आधीपेक्षा 300% ज्यादा फायदा मिळतोय असं कंपनीचं म्हणणं आहे. सध्या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये प्रत्येक रेंजमधील प्लॅन उपलब्ध आहेत, त्याद्वारे अनेक फायदे युजरला होतात. अशात, जर तुम्हाला बेस्ट प्लॅन निवडण्यामध्ये अडचण येत असेल तर आम्ही काही प्लॅन्सबद्दल माहिती देणार आहोत.

रिलायंस जिओ 199 रुपयांचा प्लॅन –
या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1.5जीबी डेटा, जिओ ते जिओ नेटवर्कसाठी मोफत कॉलिंग, इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे, दररोज 100 एसएमएस मोफत आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. या प्लॅनची वैधता २८ दिवस आहे.

रिलायंस जिओ 349 रुपयांचा प्लॅन –
अधिक इंटरनेटचा वापर करणाऱ्यांसाठी हा प्लॅन उपयोगी आहे. यामध्ये युजर्सना दररोज 3जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये जिओच्या नेटवर्कवर मोफत कॉलिंग, इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 FUP मिनिट मिळतात. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

रिलायंस जिओ 599 रुपयांचा प्लॅन –
या प्लॅनची वैधता 84 दिवस आहे. यामध्ये युजर्सना दररोज 2जीबी डेटा आणि 100 फ्री एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये जिओ नेटवर्कसाठी मोफत कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3000 कॉलिंग मिनिट मिळतात. अन्य प्लॅन्सप्रमाणे या प्लॅनमध्येही जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

रिलायंस जिओ 2,020 रुपयांचा प्लॅन –
जिओच्या या प्लॅनची वैधता 365 दिवस असून यामध्ये युजर्सना दररोज 1.5जीबी डेटा मिळतो. यामध्ये जिओ ते जिओ कॉलिंग मोफत असून अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 12,000 मिनिट मिळतात. या प्लॅनमध्येही जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.