News Flash

यंदा सक्रांतीला व्हॉट्सअप स्टीकर्स पाठवून द्या शुभेच्छा; जाणून घ्या कशाप्रकारे

शुभेच्छा देण्यासाठी वापरा व्हॉटसअॅपचे नवीन फीचर

फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वीच आपले स्टीकर्सचे नवीन फीचर लाँच केले होते. अँड्रॉईड आणि आयफोन अशा दोन्हीसाठी सुरु झालेल्या या फीचरचा युजर्सनी मोठ्या प्रमाणात वापर केला होता. वेगवेगळ्या निमित्ताने मित्रमंडळींना आणि कुटुंबातील व्यक्तींना शुभेच्छा देण्यासाठी या फीचरचा वापर करण्यात येतो. आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुम्ही एकमेकांना शुभेच्छा देण्याचा विचार करत असाल तर या स्टीकर्सचा वापर करुन तुम्ही शुभेच्छा देऊ शकता. आता हे स्टीकर कसे तयार करायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी काही सोप्या पायऱ्या पाहूयात…

अँड्रॉईड युजर्ससाठी

१. व्हॉट्सअॅप ओपन करुन स्मायली आयकॉनवर क्लिक करावे लागेल.
२. स्मायलीच्या पर्यायामध्ये GIF च्या बाजूला स्टीकरचा पर्याय येईल.
३. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या स्टीकरचे पॅक दिसतील.
४. त्यामध्ये Get more stickers असा पर्याय असेल, मकर संक्रांतीचे स्टीकर्स मिळवण्यासाठी त्यावर क्लिक करा.
५. यानंतर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाल
६. यामध्ये तुम्हाला स्टीकर्ससाठी अनेक अॅप्लिकेशन्स मिळतील, त्यातून तुम्हाला हवी ती स्टीकर्स तुम्ही डाऊनलोड करुन घेऊ शकता.
७. डाऊनलोडींग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ते अॅप्लिकेशन ओपन करुन Add to Whatsapp या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
८. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मकर संक्रांतीचे स्टीकर्स मिळतील. हे स्टीकर्स तुम्ही एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी पाठवू शकाल.

आयफोन युजर्ससाठी

१. आयफोन युजर्सना कोणत्याही अॅप्लिकेशनच्या माध्यमातून स्टीकर्स डाऊनलोड करण्याचा पर्याय नसेल. पण याठिकाणी असलेल्या पर्यायामुळे तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊ शकता.
२. तुम्हाला आलेले स्टीकर तुम्ही फेवरेट म्हणून मार्क केल्यानतंर ते तुमच्याकडे सेव्ह राहणार आहे. यासाठी तुम्हाला त्यावर लाँग प्रेस करुन स्टार मार्क करुन ठेवावे लागणार आहे.
३. मग एकदा या स्टार मार्कवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही मार्क केलेले सगळे फेवरेट स्टीकर्स एका ठिकाणी दिसतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 12:54 pm

Web Title: know how to send makar sankranti stickers on whatsapp
Next Stories
1 जाणून घ्या भोगीचे महत्त्व
2 सॅमसंगच्या ‘या’ शानदार स्मार्टफोनच्या किंमतीत 25 हजारांची कपात
3 Makar Sankranti 2019 : मकर संक्रांती म्हणजे काय ?
Just Now!
X