News Flash

तरुणांनो ध्येयनिश्चितीसाठी या गोष्टी करा

एखादी गोष्ट तुम्ही मनापासून ठरवली आणि त्या दिशेने प्रयत्न चालू ठेवले तर तुम्हाला यश नक्की मिळेल.

मातीमध्ये असणाऱ्या गुणधर्ममुळे आपण जो आकार देऊ तसा आकार ती माती घेते. आणि शेवटी एक सुबक असे पात्र आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या अंगात जन्मजात काही विशिष्ट गुण असतात. याच गुणांच्या जोरावर विद्यार्थी आपले करिअर निवडत असतात. आपल्याला आजूबाजूला खूप कमी लोक यशस्वी होताना दिसतात. आता यशस्वी होणाऱ्यांना हे कसं जमतं ? असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडतो. या प्रश्नाचे उत्तर तुमच्या प्रश्नामध्येच आहे. इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमध्ये रंगाची वेगवेगळ्या छटा असते. माणसांमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता असतात. त्यामध्ये आंतरिक क्षमता आणि बाह्य क्षमता यांचा समावेश असतो. आयुष्यामध्ये यश मिळालेल्या व्यक्ती आंतरिक क्षमतेकडे जास्त लक्ष देतात,
आंतरिक क्षमता (Potential)  म्हणजे तुमच्या मनाची ताकद. एखादी गोष्ट तुम्ही मनापासून ठरवली आणि त्या दिशेने प्रयत्न चालू ठेवले तर तुम्हाला यश नक्की मिळेल. शालेय जीवन आपण फक्त परीक्षा आणि अभ्यास यामध्ये व्यतीत करतो. पण वयाच्या या नाजूक आणि महत्वाच्या टप्प्यावर आपण स्वतःचा शोध थांबवतो.

– आंतरिक क्षमता  (Potential) ओळखण्याची विकसित करण्याची पद्धत :

– आंतरिक क्षमता  (Potential)    ओळखण्यासाठी एका कागदावर तुमच्या व्यक्तिमत्वातील चांगले वाईट गुण शोधून काढा.

– तुमचे ध्येय निश्चित करा.

– ध्येय  निश्चित  करण्यासाठी एस डब्लू ओ टी (SWOT) चा वापर करा. यामध्ये strengths (बलस्थाने),  डब्लू    म्हणजे  weakness  (कमी असणारे गुण),    ओ  म्हणजेopportunity  (संधी)    आणि टी म्हणजे  threats  (येणाऱ्या अडचणी).

म्हणजेच तुमच्या स्वभावातील बलस्थाने ओळखावी  म्हणजेच कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही चांगले काम करू शकता. एकदा की तुमची बलस्थाने तुम्हाला कळली की त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचे करिअर करू शकता, विकनेस म्हणजे कमतरता, ज्या गुणांवर जास्त काम करावे लागेल. जेणेकरून तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये मागे राहणार नाही.  पुढील घटक म्हणजे आपण जे काही करणार आहोत त्यामध्ये असणाऱ्या संधी आणि येणाऱ्या अडचणी. एकदा तुम्हाला तुमची बलस्थाने कळली की आपण त्या दिशेने काम करतो. पण ते काम करताना आपल्याला येणाऱ्या अडचणींबाबत आपण सावध राहिलो तर आपण जास्त चांगल्या पद्धतीने रिझल्ट देऊ शकतो. या चार घटकांवर आपण काम केले तर यश हे तुमचेच असेल.

वैशाली गव्हाणकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 5:23 pm

Web Title: know how to set your goal
Next Stories
1 SONY चे दोन शानदार टीव्ही लॉन्च, किंमत ऐकून SHOCK बसेल
2 आता मायक्रोव्हेव ओव्हनच घेणार तुमची ऑर्डर
3 गणेशोत्सवानिमित्त BSNLची धमाकेदार ऑफर; रोज २.२ जीबी अधिक डेटा
Just Now!
X