27 October 2020

News Flash

हातमागावरील साड्यांची किमया

जरीच्या साड्या नेसून तुम्ही कंटाळला आहात का?

या नवीन वर्षामध्ये आता नव नवीन कार्यक्रम, लग्नसराई, सण या सर्वाची रेलचेल असेलच. पण या सर्व कार्यक्रमांमध्ये फक्त जरदोशी, पैठणी, आणि जरीच्या साड्या नेसून तुम्ही कंटाळला आहात का ? असाल तर हे काही साड्याचे प्रकार फक्त तुमच्यासाठी. ह्या साड्या तुमचा संपूर्ण चेहरा मोहराच बदलून टाकतील. भारताची ही समृद्ध वस्त्रपरंपरा अभिमानास्पद अशीच आहे. याच वस्त्रपरंपरेतील एक प्रकार म्हणजे हातमाग. माग या यंत्रावर हाताने विणलेल्या कापडाला हातमागावरील कापड असे म्हटले जाते. नंतर त्यांवर नैसर्गिक रंगानी कलाकुसर केली जाते. जगभरात भारतीय हातमागाला प्रचंड मागणी आहे.

१. खादी सिल्क : रेशमी किड्याच्या कोषांपासुन एक प्रकारचा अत्यंत मऊ, तलम व बारीक धागा तयार केला जातो. त्यानंतर या धाग्याची वस्त्रे हातमागावर विणली जातात. ती एवढी तलम असतात की, एक संपूर्ण साडी अंगठी मधून निघू शकते. सिल्क म्हणजेच रेशम याला भारतामध्ये खूप महत्व आहे. भारताच्या पूर्व आणि उत्तरेला त्याला रेशीम असे संबोधतात तर दक्षिणेमध्ये त्यास पत्तू असे म्हणतात. जगामध्ये सिल्क च्या उत्पादनामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो तर पहिल्या क्रमांकावर चीन आहे. भारतामध्ये ९७ % सिल्क हे आंध्रप्रदेश, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यातून येते. रेशमी किड्याच्या कोषांपासुन तयार झालेले धागे हातमागावर विणले जातात आणि त्यापासून साडी तयार करण्यात येते. या साडीचे अजून एक वैशिष्य म्हणजे ह्या साडीमध्ये वापरले जाणारे सर्व रंग निसर्गामधून तयार केलेले असतात. त्यामुळे ही साडी नेसल्यानंतर आपल्याला स्वर्गीय आनंद मिळतो हे नक्की.

खादी सिल्क ओळखण्याच्या पध्दती :

 • खादी सिल्कच्या साडीतील दोन भाग हातामध्ये घेऊन तो एकमेकांवरती घासा जर तुम्हाला तिथे उबदारपणा जाणवला तर क्षणाचाही विलंब न लावता ती साडी खरेदी करा.
 • जर तुम्ही घेत असणारी साडी जर जास्त हेव्ही नसेल तर तुमच्याकडे असणाऱ्या अंगठी मधून ती आरपार सहज जाऊ शकेल
  सिल्कची साडी बनवण्यासाठी लागणारी मेहनत पाहता ही इतर साड्यापेक्षा महाग असते.
 • सिल्कची साडी ओळखण्याची अजून एक उत्तम पद्धत म्हणजे त्या कापडाची चमक. सिल्कच्या साडीला एक वेगळीच चमक असते.
  सिल्कची साडी जेवढी जुनी होईल तेवढी ती सुंदर दिसू लागते.

२. खादी लिनन : लिनन युजीटेटीसीमम या पासून हा लिनन हा कपडा तयार होतो. या कापडाचे महत्त्व असे आहे की हे कापड थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला गर्मी देते आणि गरमीच्या दिवसांमध्ये शरीराला थंड ठेवण्याचे काम करत असते. प्राचीन काळामध्ये मिस्र लोक ममी बनवण्यासाठी या कापडाचा वापर करायचे.
खादी लिनन ओळखण्याच्या पध्दतीः

 • खादी लिननची साडी ओळखण्याची एक पद्धत म्हणेज त्यातील काही धागे जाळून पहा. जर ते जळताना प्लास्टिकचा वास येत असेल तर ते खरे लिनन नाही आहे.
 • लिनन हा प्रकार खूप उशिराने पेट घेतो.
 • खादी लिननला आपण स्पर्श केल्यावरचं त्याचे वेगळेपण आपल्याला जाणवते. कापसासारखा माऊ असा त्याचा स्पर्श असतो.

३. मटका सिल्क : बोम्बीक्स मोरीपासून अळ्यांपासून बनलेल्या एका जाड धागातून मटका सिल्क निर्माण होते. मटका सिल्क हे कच्चे हातमागाचे कापड आहे. मटका सिल्कला जाडसरपण येण्यासाठी लोकरीचा वापर केला जातो. याचे उत्पादन कर्नाटक आणि काश्मीर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते.

मटका सिल्क ओळखण्याच्या पध्दतीः

 • मटका सिल्कच्या साड्या ह्या वजनाने हलक्या असतात.
 • सिल्कला फार चकाकी असते.

४. महेश्वरी : नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या महेश्वर या गाव मध्ये महेश्वरी या वस्त्राचा उगम झाला आहे. सुरुवाती पासूनच माहेश्वरी साडी म्हणजे राजे राजवाड्याची साडी म्हणून मानली जाते. तिला ही ओळख आजही आहे.

महेश्वरी साडी ओळखण्याच्या पध्दतीः

 • महेश्वरी साडी ही सुती किंवा रेशमी कापडापासून बनवली जाते.
 • महेश्वरी साडी खरेदी करताना तिच्या काठाकडे नक्की लक्ष द्या त्यावरूनच ती साडी महेश्वरी आहे की नाही हे तुमच्या लक्षात येईल
  महेश्वरी साडी तयार करताना वेगळ्या प्रकारच्या जरीचा आणि किनारीचा वापर केला जातो. इतर साड्यापेक्षा ही साडी खूपच उठून दिसते.
 • महेश्वरी साडीच्या कर्णफुल या प्रकारामध्ये साडीच्या काठाला वेगवेगळ्या प्रकारची फुले व पानांची सुंदर जरी असते.
 • या साड्या त्यांच्या पदरावरून सुद्धा ओळखता येतात. या साडीचा पदर पाच पदरी आणि दोन ते तीन रंगामध्ये बनलेला असतो.

५ कांथावर्क : पश्चिम बंगाल, ओडीसा, या राज्याची वैशिट्य म्हणजे कांथावर्क. बारीक शिवणकाम असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, उश्याची कवर यांसाठी कांथावर्कचा वापर केला जातो. पश्चिम बंगालच्या पारंपारिक कपड्यामध्ये कांथावर्कचा समावेश होतो. कांथावर्कला नक्षी कंठ म्हणून सुद्धा ओळखले जाते.

कांथावर्क ओळखण्याच्या पध्दती

 • बारीक सुईने विणलेले सुंदर नक्षी काम आपल्याला लगेचच समजून येते.

–  उज्वल सामंत (उज्वल तारा- संचालिका, हॅण्डलूम स्पेशलिस्ट)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2018 11:10 am

Web Title: know more about haathmag saari
Next Stories
1 Happy Teddy Day 2018 : जाणून घ्या कुठल्या रंगाचा टेडी काय दर्शवतो?
2 कुपोषणामुळे सदोष श्रवण यंत्रणेचा धोका
3 आहारावर नियंत्रण कर्करुग्णांसाठी उपयुक्त
Just Now!
X