टाटा मोटर्स या ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामवंत कंपनीने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी खास मॉन्सून ऑफर्स जाहीर केल्या आहेत. जुलै महिन्यामध्ये ग्राहकांना या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. ग्राहकांशी अधिक प्रभावी पद्धतीने जोडून घेण्यासाठी कंपनी आपल्या विस्तारणाऱ्या जाळ्याच्या क्षमतेचा लाभ घेत आहे. जुलै २०१८ मध्ये कंपनीने टिगोर, नॅनो, हेक्झा, सफारी स्ट्रोम आणि झेस्ट या मॉडेल्ससाठी पहिल्या वर्षाचा विमा हप्ता केवळ एक रुपयाला देऊ केला आहे. याबरोबरच निवडक मॉडेल्सवर २०,००० ते ३०,००० रुपयांची सवलत देऊन ग्राहकांना खुश केले आहे. संभाव्य खरेदीदारांसाठी कंपनीने वर उल्लेख केलेल्या मॉडेल्सवर आणि नेक्सन व टिअॅगोच्या सर्व प्रकारांवर १५००० रुपयांपर्यंत एक्स्चेंज डिस्काऊंटही जाहीर केले आहे.

या जाहीर झालेल्या ऑफर्सबद्दल टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन व्यवसाय विभागाचे (पीव्हीबीयू) उपाध्यक्ष एस. एन. बर्मन म्हणाले, “आमच्या ग्राहकांसाठी हा पावसाळा अधिक खास व्हावा म्हणून आम्ही या ऑफर्स जाहीर केल्या आहेत. आमच्या सर्व ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन त्यांना जास्तीत जास्त लाभ पुरवण्याच्या एकमेव उद्देशाने आम्ही या ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या उपक्रमामुळे खरेदीदारांचा आमच्यासोबत ब्रॅंड म्हणून असलेला संबंध अधिक दृढ होईल यावर आमचा ठाम विश्वास आहे. सध्याच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही चांगली प्रगती केली आहे आणि ग्राहकांच्या निर्णय प्रक्रियेबद्दल आम्ही जाणून घेत आहोत असेही ते म्हणाले.

”यामध्ये कार्यक्षम विक्रीउत्तर सेवा देणे, तक्रारी कमी करणे आणि सर्व ग्राहकांच्या सतत बदलत असलेल्या मागण्या पूर्ण करणाऱ्या अर्थपूर्ण ऑफर्स देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.” असेही ते म्हणाले. संपूर्ण देशात जून २०१८ मध्ये १८,२१३ युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही विक्री ६३ टक्क्यांनी वाढली आहे. यासोबतच कंपनीच्या नेटवर्कमध्येही मोठी वाढ होऊन ते ४०० आउटलेट्सपासून ७४६ आउटलेट्सपर्यंत पोहोचले आहे. ही संख्या या वर्षाच्या अखेरीपर्यंत ८५० पर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. त्यातच आताच्या ऑफर्समुळे पुढल महिन्यापासून असणारा सणासुदीचा काळ व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल.