27 February 2021

News Flash

…म्हणून झोपताना चेहऱ्याला क्रिम लावून झोपायला हवे

पुरेशी काळजी घेतल्यास त्वचा चांगली राहण्यास मदत

त्वचा हा आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील अवयव असल्याने त्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. इतर गोष्टींची काळजी घेत असताना आपण आपल्या त्वचेची काळजी घेणे विसरतो. त्यामुळे आपल्याला त्वचेच्या विविध समस्या उद्भवण्याची शक्यता असते. यातही चेहऱ्यावर येणारे डाग, पुटकुळ्या, त्वचा लाल होणे, त्यावर डाग पडणे अशा समस्या उद्भवतात. मग काहीतरी झाल्यावर जागे होण्यापेक्षा आधीपासूनच योग्य ती काळजी घेतल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.

साधारणपणे त्वचेला काही झाल्यास त्यावर घरगुती उपाय आणि बाजारात मिळणारी वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्यप्रसाधने वापरणे असे दोन मार्ग अवलंबले जातात. त्वचा सुंदर, तजेलदार व निरोगी ठेवण्यासाठी चेहऱ्याला विविध पॅक लावण्याचाही पर्याय काही जण स्विकारतात. त्यामुळे चेहरा उजळण्यासाठी चेहऱ्याला आपल्या त्वचेला सूट होणारे एखादे क्रिम लावलेले केव्हाही चांगले. पाहूयात रात्री चेहऱ्याला क्रिम लावून झोपण्याचे फायदे…

१. त्वचा हायड्रेट राहण्यास मदत – अनेकांना त्वचा कोरडी पडण्याची समस्या असते. रात्रीच्या वेळी हवेत गारवा असल्याने त्वचा जास्त कोरडी होते. मात्र त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यासाठी तिला क्रिम लावणे उपयुक्त ठरते. त्यामुळे कोरडेपणा कमी होण्यासही मदत होते. याबरोबरच नाईट क्रिमच्या वापराने त्वचेला आवश्यक असणारी पोषक तत्वेही मिळतात.

२. रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत – चेहऱ्याची त्वचा चांगली राहण्यासाठी त्याचे रक्ताभिसरण सुरळीत होणे आवश्यक असते. क्रिम लावताना आपण सगळ्या चेहऱ्यावरुन हात फिरवतो. त्यामुळे नकळत रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. यामुळे चेहऱ्याचा रंग उजळण्यासही मदत होते.

३. सूज आणि इतर त्रास कमी होण्यास मदत – काही कारणांनी आपल्या चेहऱ्याला सूज येते. किंवा अचानक खाज येण्यास सुरुवात होते. मात्र रात्री झोपताना क्रिम लावल्याने खाजविण्याचा किंवा इतर त्रास कमी होण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावर येणारी सूजही कमी होण्यास उपयोग होतो.

४. वाढलेले वय लपविण्यास उपयुक्त – वय वाढते तसे आपल्या चेहऱ्यावर ते दिसू लागते. मात्र आपले वाढलेले वय दिसू नये यासाठी आपण झटत असतो. त्यामुळे झोपताना क्रिम लावणे हा वय लपविण्यासाठी उत्तम उपाय ठरु शकतो. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या येण्याचा वेग कमी होतो. आता हे क्रिम नेमके कोणते असावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेतलेला केव्हाही चांगला.

५. त्वचेला पोषण मिळते – त्वचा तुकतुकीत आणि चांगली राहण्यासाठी तिला पोषण मिळणे आवश्यक असते. हे पोषण आपल्याला आहारातून मिळते. त्याचबरोबर क्रिममध्ये असणारे काही घटक त्वचेला पोषण देण्यास उपयुक्त ठरतात. झोपताना क्रिम लावल्यास त्यातील घटकांमुळे त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा मऊ होण्यास मदत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 6:05 pm

Web Title: know what are the benefits of using night cream
Next Stories
1 चाळीपासून टॉवरपर्यंत…
2 भावी इंजिनीअरचं आजचं दु:ख
3 १२ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा लिक ! ‘हे’ क्विझ अॅप वापरताना सावधान
Just Now!
X