विमानाचा अपघात झाला की त्याचा ब्लॅक बॉक्स मिळविण्याचा प्रयत्न शोधकार्यात सहभागी असणारे घटक करतात. घाटकोपर येथे काही वेळापूर्वी चार्टर विमान कोसळून गंभीर अपघात झाला. यामध्ये वैमानिक महिलेसह विमानातील तिघांचा आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला. विमान अपघातानंतर त्यातील दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे विमानाचं फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) ज्यात विमानाशी निगडित आकडेवारी दिलेली असते तर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (सीव्हीआर) असते ज्याद्वारे संभाषण रोकॉर्ड केले जाते. यालाच ब्लॅक बॉक्स म्हणतात. आता विमान अपघातानंतर शोधला जाणारा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? त्याला ब्लॅक बॉक्स का म्हटले जाते? तो विमानात का बसवला जातो? त्याचे नेमके काम काय? यांबाबत जाणून घेऊया…

– ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा रंग काळा असेल असं तुम्हाला अगदी सहज वाटून जाईल. मात्र तसे नसून या बॉक्सचा रंग केशरी असतो.

Using Plastic Chopping Board Can Harm Stomach Throw These Four Items From Kitchen
Earth Day: तुमच्या किचनमधून आजच बाहेर काढा ‘या’ ४ वस्तू; पर्यावरणच नव्हे तर पोटाच्याही ठरतात शत्रू
Share Market
Stock Market Opening Bell : मतदानाच्या पहिल्या टप्प्यात शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स-निफ्टीची नकारात्मक सुरुवात
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच

– तो इतक्या कठिण गोष्टींनी बनवलेला असतो की त्याच्यावर आग आणि पाणी या कशाचाच परिणाम होत नाही.

–  हा बॉक्स सुरक्षित राहणे आवश्यक असल्याने तो विमानाच्या मागील भागात बसवला जातो. त्यामुळे तो सुरक्षित राहण्याची शक्यता जास्त असते.

– ब्लॅक बॉक्सच्या बॅटरीची क्षमताही अतिशय चांगली असून ती ३० दिवस टिकते. कित्येक त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही करता येतो.

– ब्लॅक बॉक्सच्या तपासणीसाठी विमान निर्माण करणाऱ्या टीमकडून त्याच्या अनेक चाचण्या केल्या जातात. या कठिण चाचण्यांमधून गेल्याननंतरच हा बॉक्स विमानाला बसविण्यात येतो.

– ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ डेव्हिड वॉरेन यांनी १९५०च्या दशकात ब्लॅक बॉक्सचा शोध लावला होता. मेलबर्नच्या वैमानिक संशोधन प्रयोगशाळेत काम करत असताना कमर्शिअल एअरक्राफ्ट अपघात झाल्याने त्यांनी हा शोध लावला. विमान दुर्घटना होण्याआधीच्या घडामोडी रेकॉर्ड करता येईल का असा विचार करुन त्यांनी फ्लाईट डेटा रेकॉर्डरवर काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ब्लॅक बॉक्सचा शोध लागला.

– १९६० मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा विमानात ब्लॅक बॉक्स लावला होता. तर भारतात नागरी उड्डाण संचलनालयाने जानेवारी २००५ पासून सर्व विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये ही दोन्ही उपकरणे बसविणे अनिवार्य केले आहे.