तरुणांचं आकर्षण असलेल्या KTM ने आपली बहुप्रतिक्षित बाइक 125 Duke भारतात लाँच केली आहे. कंपनीच्या देशातील सर्व 450 शोरुममध्ये ही बाइक विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. महिनाभरापूर्वीच बाइकसाठी नोंदणी सुरू झाली आहे.

स्टाइलच्या बाबतीत ही बाइक KTM 200 Duke प्रमाणेच आहे. ही भारतातील सर्वात स्वस्त बाइक असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 200 ड्यूक प्रमाणेच दिसणाऱ्या या बाइकचं वेगळेपण दिसावं यासाठी कंपनीने पुन्हा डिझाइन केलेले ग्राफीक्स दिले आहेत. बाइकच्या सीटची उंची 818 mm आणि वजन 148 किलो आहे. बाइकचा मायलेज किती याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, 124.7cc चं इंजिन असल्यामुळे मायलेज उत्तम असेल असं बोललं जात आहे. एंटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम (एबीएस) असलेल्या या बाइकची एक्स शोरुम किंमत कंपनीने 1.18 लाख रुपये ठेवली आहे.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
Best Selling 7 Seater Car
Innova ना Fortuner मारुतीच्या ‘या’ स्वस्त ७ सीटर कारसमोर सर्वांची बोलती बंद; दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
Rare Maldhok Bird Chick Born at Conservation Breeding Center in Rajasthan
गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….

फिचर्स –
बाइकच्या पुढील बाजूला 43 mm अपसाइड डाउन फोर्क्स आणि मागील बाजूस 10-स्टेप अॅडजस्टेबल मोनोशॉक आहे. ब्रेकिंगबाबत बोलायचं झाल्यास पुढील बाजूला 300 mm डिस्क आणि मागे 230 mm डिस्क आहे. केटीएम 125 ड्यूकमध्ये 6-स्पीड ट्रांसमिशनसह 124.7cc, लिक्विड-कूल्ड, सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 9,250rpm वर 14.5hp पावर आणि 8,000rpm वर 12Nm टॉर्क जनरेट करतं.