केटीएमने (KTM)भारतात आपली नवीन बाइक KTM 390 Adventure ही काही दिवसांपूर्वीच लाँच केली आहे. ही बाइक कंपनीने ‘2019 इंडिया बाइक वीक’मध्ये सादर केली होती. भारतीय बाजारात केटीएमच्या या बाइकची स्पर्धा BMW G310 GS आणि kawasaki versys x300 यांसारख्या गाड्यांशी असेल.

स्पेसिफिकेशन्स –
KTM 390 Adventure बाइकमध्ये नॉन-अ‍ॅडजस्टेबल 43mm USD फॉर्क अपफ्रंट युनिट आहे. बाइकचे रिअर मोनोशॉक सस्पेंशन अ‍ॅडजस्टेबल आहेत. KTM 390 ड्युक बाइकच्या तुलनेत 390 Adventure बाइकमध्ये लाँग ट्रॅव्हल WP सस्पेन्शन (170mm अपफ्रंट आणि 177mm रिअर) आहे. ब्रेकिंगसाठी फ्रंट व्हिलमध्ये 320mm रोटर आणि 230mm रिअर डिस्क ब्रेक आहे. तसेच बाइकमध्ये बाय-डायरेक्शनल क्विक-शिफ्टर हे स्टँडर्ड फीचर दिलंय. याशिवाय स्विचेबल ट्रांजेक्शन कंट्रोल, ऑफ-रोड ABS, कॉर्निंग ABS, ऑप्शनल टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, KTM MyRide स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि फुल कलर TFT डिस्प्ले स्क्रीन यांसारखे फीचर्स आहेत.

इंजिन –
KTM 390 Adventure बाइकमध्ये 373cc सिंगल-सिंलिडर, लिक्विड-कुल्ड इंजिन आहे. KTM 390 ड्यूकमध्येही याच इंजिनचा वापर करण्यात आला आहे. बीएस-6 मानकांसह असलेले इंजिन 9000rpm वर 43bhp ची ऊर्जा आणि 7,000rpm वर 37Nm पीक टॉर्क निर्माण करते. बाइकमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स आहे.

आणखी वाचा – ‘रॉयल एनफील्ड’ची अ‍ॅडव्हेंचर बाइक Himalayan लाँच, बुकिंगलाही झाली सुरूवात

किंमत –
KTM 390 Adventure बाइकची एक्स-शोरूम किमत 2.99 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर या बाइकची स्पर्धा असलेल्या BMW G310 GS आणि kawasaki versys x300 या गाड्यांची किंमत अनुक्रमे 3.49 लाख रुपये आणि 4.69 लाख रुपये इतकी आहे.