News Flash

शुक्राणूंच्या कमतरतेने आजारपणाचा धोका अधिक

पुरुषांच्या आरोग्याचा अभ्यास केला.

( संग्रहीत छायाचित्र )

कमी शुक्राणू व्यक्तींना आजारपणाचा धोका इतरांपेक्षा अधिक असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. संशोधन करण्यात आलेल्या ५,१७७ पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी, चरबीचे प्रमाण २० टक्के अधिक, उच्च रक्तदाब आणि खराब कोलेस्टेरॉल असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे लैंगिक वैशिष्टय़ांमध्ये वाढ करणारे टेस्टोस्टेरोन या संप्रेरकाची पातळी कमी असल्याचेही स्पष्ट झाले आहे. संशोधकांनी सांगितले की ज्या व्यक्तींमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असते त्यांच्यामध्ये अधिक आरोग्य समस्या असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेची समस्या ही प्रत्येकी तीनपैकी एका जोडप्याची समस्या असल्याचे संशोधकांनी सांगितले.

परंतु नवीन अभ्यासासाठी संशोधकांनी इटलीतील जोडप्यांमधील पुरुषांच्या आरोग्याचा अभ्यास केला. वीर्याची गुणवत्ता ही पुरुषांच्या आरोग्याशी थेट संबंधित असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. शुक्राणूंची संख्या कमी असलेल्या अनेक व्यक्तींचा यादरम्यान संशोधकांनी अभ्यास केला. त्यानुसार ही समस्या असलेल्या व्यक्तींना उच्च रक्तदाब, मधूमेह आणि हृदयविकाराचा धोका असल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले. या संशोधनात पुरुषांमध्ये १२ पटींनी  टेस्टोस्टेरोन या संप्रेरकाची पातळी कमी असल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे मांसपेशी आणि स्नायूंच्या आजारांचाही धोका संभवत असल्याचे संशोधकांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 1:17 am

Web Title: lack of sperm not good for health
Next Stories
1 Gudi Padwa 2018: सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर उभारली शुभेच्छांची गुढी
2 Video: नववर्षाच्या शोभायात्रेतील विविध रंग
3 Gudi Padwa 2018: राज्यात नवचैतन्याची गुढी!, जल्लोषात नववर्षाचं स्वागत
Just Now!
X