News Flash

‘लँबॉर्गिनी’ची शानदार Aventador SVJ भारतात लाँच, किंमत…

जगभरात केवळ 600 कारची निर्मिती होणार, कारची किंमत...

(PC : Bren Garage and NDTV auto)

जगविख्यात कार निर्माती कंपनी ‘लँबॉरगिनी’ने आपली हायस्पीड कार ‘अव्हेंताडोर एसव्हीजे’ (Lamborghini Aventador SVJ) भारतात लाँच केली आहे. ही सुपर स्पोर्ट्स कार कंपनीने 2018 मध्ये लाँच केली होती, 21 जानेवारी रोजी भारतात या कारचं आगमन झालंय. बेंगळुरूमधील एका कार प्रेमीने ही कार खरेदी केली आहे.

(PC : Bren Garage and NDTV auto)

या कारची किंमत तब्बल 6 ते 6.25 कोटी रुपये इतकी आहे. शून्य ते अवघ्या 2.8 सेकंदांमध्ये ही कार 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग पकडते. तर 0 ते 200 किलोमीटर प्रति तास इतका वेग पकडण्यास या कारला केवळ 8.6 सेकंद लागतात. 349 किलोमीटर प्रति तास इतका या कारचा टॉप स्पीड आहे.

या शानदार कारमध्ये 6.5 व्ही 12 हे ताकदवान इंजिन देण्यात आलं आहे.

या कारची लांबी 4,843 एमएम, रुंदी 2,273 एमएम आणि उंची 1,136 एमएम आहे. कारचं शक्तीशाली इंजिन 770 पावर आणि 720 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

जगभरात केवळ 600 कारची निर्मीती होणार असल्याचं समजतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 12:01 pm

Web Title: lamborghini aventador svj launched in india
Next Stories
1 ‘निसान’ची नवी एसयुव्ही ‘किक्स’ लाँच, किंमत 9.55 लाख रुपये
2 मारुती सुझुकीची नवी Baleno , 11 हजार रुपयांत बुकिंग सुरू
3 48MP कॅमेरा आणि पंचहोल डिस्प्ले , Honor View 20 चं आज ग्लोबल लाँचिंग
Just Now!
X