News Flash

Samsung Galaxy J6 भारतात दाखल

आजपासून फोन बाजारात उपलब्ध

मोबाईल कंपन्यांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरु असून दिवसागणिक कंपन्या नवनवीन फोन दाखल करत आहेत. सॅमसंग या नामवंत कंपनीने नुकतेच आपले एक नवीन मॉडेल बाजारात दाखल केले आहे. या फोनचे नाव Samsung Galaxy J6 असून त्याच्या लाँचचा कार्यक्रम नुकताच मुंबईत पार पडला. आपल्या या नवीन फोनबाबत कंपनी सोशल मीडियावर मागच्या काही दिवसांपासून माहिती देत आहे. या फोनच्या विक्रीच्या संदर्भात सॅमसंग इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती दिली आहे. या ट्विटनुसार हा फोन आजपासून बाजारात विक्रिसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.

सॅमसंगने या फोनचा एक टीझरही दाखल केला आहे. या फोनच्या बाबतीतील एक टीझरही कंपनीने जाहीर केला होता. ज्याच्या कॅप्शनमध्ये नवी डिझाईन आणि फिचर्सबरोबरच तुमचे आयुष्य आनंदी बनवेल. आपल्या या नवीन फोनच्या प्रमोशनसाठी कंपनी #ToInfinityAndMore आणि #GalaxyJ6 हा हॅशटॅग वापरत आहे. हा फोन अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल असेही सांगण्यात आले आहे. या फोनची किंमत १३,९९० रुपये इतकी असून ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. दुसरीकडे सॅमसंगने नुकत्याच लाँच झालेल्या OnePlus 6 ला टक्कर देण्यासाठी Galaxy S8 आणि Galaxy A8+ वर कॅशबॅक ऑफर दिली आहे. या दोन्ही फोनवर कंपनीने अनुक्रमे ८ हजार आणि ५ हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2018 7:10 pm

Web Title: launch of samsung galaxy j6 price specifications in india
Next Stories
1 आपल्या एनफिल्ड बुलेटची जगाच्या बाजारात रॉयल एंट्री
2 असा ट्रान्सफर करा तुमचा भविष्य निर्वाह निधी
3 ज्वारी आणि बाजरीपासून बनवता येतात ‘हे’ हटके पदार्थ
Just Now!
X