भारतात Lava कंपनीचा नवीन ‘मेड इन इंडिया’ फोन लाँच झाला आहे. Lava Z61 Pro हा बजेट स्मार्टफोन कंपनीने बाजारात आणला आहे. लावा मोबाइल्सच्या या नवीन बजेट स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर नाहीये पण फेस अनलॉक फीचर दिलं आहे.

फीचर्स :-
Lava Z61 Pro फोनमध्ये 1.6 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर प्रोसेसर असून 5.45 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. लवकरच ऑफलाइन मार्केटमध्येही हा फोन उपलब्ध केला जाईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. या फोनसाठी मिडनाईट ब्लू आणि एंबर रेड असे दोन रंगांचे पर्याय आहेत. फोनला कॅप्सूलसारखा कॅमेरा मॉड्यूल असून पोर्ट्रेट मोड, बोकेह, बर्स्ट मोड, पॅनोरमा, फिल्टर्स, ब्यूटी मोड, एचडीआर आणि नाइट मोड यांसारखे अनेक कॅमेरा फीचर्स यात आहेत. 2जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनला 128 जीबीपर्यंत मेमरी कार्डचा सपोर्ट आहे. लावा झेड61 प्रोमध्ये 3,100 एमएएच क्षमतेची बॅटरी कंपनीने दिली आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 4.2, वाय-फाय, जीपीएस, युएसबी ओटीजी आणि माइक्रो-युएसबीचा पर्याय आहे.

किंमत :-
लावा मोबाइल्सने 5,774 रुपये इतकी Lava Z61 Pro या फोनची किंमत ठेवली आहे.