ज्या व्यक्ती सहा तासांपेक्षा कमी वेळ झोपतात अशा मध्यम तसेच वयस्कर वयाच्या लोकांना स्ट्रोकचा धोका अधिक प्रमाणात असल्याचे एका संशोधनात आढळले आहे. त्यामुळे रोज पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.
अमेरिकेमधील बोस्टन येथील असोसिएट प्रोफेशनल स्लीप सोसायटीच्या संशोधकांनी परीक्षणासाठी सर्वसामान्य उंचीच्या तसेच ज्यांच्यामध्ये स्ट्रोकची कोणतीही लक्षणे नाहीत अशा लोकांची निवड केली. बॉडी इंडेक्स मास आणि झोपेबाबत संशोधन करणार्‍या संशोधकांना असे दिसून आले की, जे मध्यमवयीन तसेच वृद्ध लोक रोज सहा तासांपेक्षा कमी वेळ झोपतात त्यांच्यामध्ये स्ट्रोकची लक्षणे मोठ्या संख्येने दिसून येतात. कमी झोप अनेक बाबतीत धोकादायक ठरू शकते हे निष्पन्न झाले आहे.
पुरेशी झोप न घेतल्यास रोगाला आमंत्रण देण्यासारखे आहे, त्यामुळे पुरेशी झोप घ्या आणि आजारापासून लांब राहा.