LG या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने आपल्या मोबाइल बिझनेसमधून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण कोरियाच्या एलजी कंपनीने मोबाइल बिझनेस बंद करत असल्याचं सोमवारी एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे.

काय आहे कारण?
मोबाइल सेगमेंटमध्ये सतत होत असलेल्या तोट्यामुळे हा निर्णय घेतल्याचं कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलंय. तसेच, आता इलेक्ट्रिक व्हेइकल्स कंपोनेंट्स, रोबोटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कनेक्टेड डिव्हाइस, स्मार्ट होम्स, बिझनेस-टू-बिझनेस सोल्युशन अशा सेगमेंटमध्ये लक्ष्य केंद्रीत करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Make Delicious Home Made Bread Poha For Breakfast Or Evening Snacks Note The Yummy Recipe
नाश्त्याला स्पेशल काय करायचं? झटपट होणारा ‘ब्रेड पोहा’ बनवून पाहा; रेसिपी लगेच नोट करा
Yamaha Aerox 155 Version S launch
Hero, Honda चे धाबे दणाणले, यामाहाची नवी स्कूटर देशात दाखल; चावी शिवाय होणार सुरू, ना चोरीचे टेन्शन, किंमत…
The Best Place to Put Your Router For Strong Wi-Fi
WiFi Router: इंटरनेट खूपच स्लो चालतंय? वाय-फाय राउटरला ‘या’ ठिकाणी ठेवल्यास मिळेल सुपरफास्ट स्पीड
Facebook Update video player In vertical full screen That Offers alongside video playback controls
फेसबुक देणार इन्स्टाग्राम Reels ला टक्कर! नवीन अपडेटमध्ये होणार ‘हा’ बदल, जाणून घ्या

ठराविक कालावधीपर्यंत मिळणार सपोर्ट आणि सॉफ्टवेअर अपडेट :-
सध्या उपलब्ध असलेला स्टॉक संपेपर्यंत कंपनीचे फोन बाजारात उफलब्ध होत राहतील. तसेच एका ठराविक कालावधीपर्यंत एलजीचे फोन वापरणाऱ्या ग्राहकांना सर्व्हिस सपोर्ट आणि सॉफ्टवेअर अपडेटही जारी केले जाईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

३१ जुलैपर्यंत पूर्ण बंद होणार :
एलजीने दिलेल्या माहितीनुसार, मोबाइल फोनचा बिझनेस पूर्णपणे बंद करण्यासाठी ३१ जुलैपर्यंतचा कालावधी लागेल. या तारखेनंतरही काही फोन मॉडेल्सचा स्टॉक मार्केटमध्ये उपलब्ध राहू शकतो, असं कंपनीने म्हटलं आहे. LG चे विंग, वेल्वेट, Q सीरिज, W सीरिज आणि K सीरीजचे स्मार्टफोन आधीच मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या सर्व मॉडेल्सची विक्री थांबवण्यात येणार नाही व ग्राहकांना सॉफ्टवेअर अपडेट ठराविक कालावधीपर्यंत मिळत राहतील असं एलजीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे सध्यातरी एलजी फोन वापरणाऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण सपोर्ट आणि सॉफ्टवेअर अपडेट देणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलंय.

अचानक निर्णय नाही :-
दरम्यान, मोबाइल फोन बिझनेस बंद करण्याचा एलजीचा निर्णय आश्चर्यकारक नाहीये. यापूर्वी जानेवारीमध्ये कंपनीच्या सीईओंनी मोबाइल बिझनेसमध्ये सतत तोटा होत असल्याने अन्य सेगमेंटमध्ये लक्ष्य केंद्रीत करण्याचा विचार असल्याचं म्हटलं होतं. तेव्हापासून कंपनी मोबाइल बिझनेस बंद करणार असल्याची चर्चा होती. गेल्या जवळपास सहा वर्षांपासून एलजीला मोबाइल बिझनेसमध्ये तोटा सहन करावा लागत होता, असं समजतंय.