News Flash

LG स्मार्टफोन युजर्ससाठी खूशखबर, मोबाइल बिझनेस बंद केल्यानंतर केली महत्त्वाची घोषणा

कंपनीने काही दिवसांपूर्वीच मोबाइल बिझनेस बंद करत असल्याची केली होती घोषणा...

(संग्रहित छायाचित्र, सौजन्य - रॉयटर्स)

LG या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने या आठवड्याच्या सुरूवातीलाच आपल्या मोबाइल बिझनेसमधून काढता पाय घेण्याची घोषणा केली. दक्षिण कोरियाच्या एलजी कंपनीने मोबाइल बिझनेस बंद करत असल्याचं सोमवारी एका निवेदनाद्वारे जाहीर केलं,  त्यानंतर एलजीचे फोन वापरणारे ग्राहक चिंतेत होते. पण, आता कंपनीने एक दिलासादायक घोषणा केली आहे.

LG आपल्या प्रीमियम स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांना पुढील तीन वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट देईल. यात २०१९ मध्ये लाँच झालेल्या प्रीमियम स्मार्टफोन्सचा समावेश आहे. G सीरिज, V सीरिज, LG VELVET, LG Wing या स्मार्टफोन्सना तीन वर्षांपर्यंत अपडेट मिळेल. तर, कंपनीच्या बजेट फोन्सना अजून दोन सॉफ्टवेअर अपडेट मिळतील. यामध्ये 2020 मध्ये लाँच झालेल्या LG Stylo आणि K सीरिजमधील स्मार्टफोन्सचा समावेश आहे. या फोन्सना किमान अजून दोन सॉफ्टवेअर अपडेट मिळतील. याबाबत अतिरिक्त माहितीसाठी ग्राहकांनी त्यांच्या स्थानिक एलजी ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असंही कंपनीने एका पोस्टद्वारे सांगितलं.

का केला मोबाइल बिझनेस बंद?

आठवड्याच्या सुरूवातीला, सोमवारी एका निवेदनाद्वारे मोबाइल बिझनेस बंद करत असल्याचं एलजीकडून सांगण्यात आलं होतं. मोबाइल सेगमेंटमध्ये सतत होत असलेल्या तोट्यामुळे बिझनेस बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलं. तसेच, आता इलेक्ट्रिक व्हेइकल्स कंपोनेंट्स, रोबोटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कनेक्टेड डिव्हाइस, स्मार्ट होम्स, बिझनेस-टू-बिझनेस सोल्युशन अशा सेगमेंटमध्ये लक्ष्य केंद्रीत करणार असल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.

ठराविक कालावधीपर्यंत मिळणार सपोर्ट आणि सॉफ्टवेअर अपडेट :-
सध्या उपलब्ध असलेला स्टॉक संपेपर्यंत कंपनीचे फोन बाजारात उपलब्ध होत राहतील. तसेच एका ठराविक कालावधीपर्यंत एलजीचे फोन वापरणाऱ्या ग्राहकांना सर्व्हिस सपोर्ट आणि सॉफ्टवेअर अपडेटही जारी केले जाईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

३१ जुलैपर्यंत पूर्ण बंद होणार :
एलजीने दिलेल्या माहितीनुसार, मोबाइल फोनचा बिझनेस पूर्णपणे बंद करण्यासाठी ३१ जुलैपर्यंतचा कालावधी लागेल. या तारखेनंतरही काही फोन मॉडेल्सचा स्टॉक मार्केटमध्ये उपलब्ध राहू शकतो, असं कंपनीने म्हटलं आहे. LG चे विंग, वेल्वेट, Q सीरिज, W सीरिज आणि K सीरीजचे स्मार्टफोन आधीच मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या सर्व मॉडेल्सची विक्री थांबवण्यात येणार नाही व ग्राहकांना सॉफ्टवेअर अपडेट ठराविक कालावधीपर्यंत मिळत राहतील असं एलजीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे सध्यातरी एलजी फोन वापरणाऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण सपोर्ट आणि सॉफ्टवेअर अपडेट देणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलंय.

अचानक निर्णय नाही :-
दरम्यान, मोबाइल फोन बिझनेस बंद करण्याचा एलजीचा निर्णय आश्चर्यकारक नाहीये. यापूर्वी जानेवारीमध्ये कंपनीच्या सीईओंनी मोबाइल बिझनेसमध्ये सतत तोटा होत असल्याने अन्य सेगमेंटमध्ये लक्ष्य केंद्रीत करण्याचा विचार असल्याचं म्हटलं होतं. तेव्हापासून कंपनी मोबाइल बिझनेस बंद करणार असल्याची चर्चा होती. गेल्या जवळपास सहा वर्षांपासून एलजीला मोबाइल बिझनेसमध्ये तोटा सहन करावा लागत होता, असं समजतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 2:51 pm

Web Title: lg confirms up to three android os updates for premium smartphones sas 89
Next Stories
1 फक्त 8 हजार 999 रुपयांत आला Samsung Galaxy F02s, उद्या पहिला ‘सेल’; काय आहे खासियत?
2 उद्यापासून IPL ला होणार सुरुवात, Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये फ्रीमध्ये घ्या मजा; जाणून घ्या सविस्तर
3 दमदार Poco M2 Pro वर आकर्षक डिस्काउंट, कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी
Just Now!
X