News Flash

LG ने आणला जगातील पहिला 8k OLED टिव्ही

CES 2019 मध्ये पहिल्यांदा LG 88Z9 हा टिव्ही कंपनीने सर्वांसमोर आणला होता.

LG ने जानेवारी महिन्यातच जगातील पहिला 8k OLED टिव्ही लाँच करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता कंपनीने OLED88Z9K या नावाने लाँच केलेल्या पहिल्या 8k OLED टिव्हीचे प्री बुकींग सुरू केले आहे. सध्या केवळ दक्षिण कोरियामध्ये हा टिव्ही लाँच करण्यात आला आहे.

जुलै महिन्यापासून या टिव्हीची विक्री सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर अमेरिका आणि युरोपीय देशांमध्येही या टिव्हीची विक्री सुरू करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. परंतु भारतात या टिव्हीची विक्री कधी सुरू होईल, याबाबत मात्र कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही.

काय आहे विशेष ?
CES 2019 मध्ये पहिल्यांदा LG 88Z9 हा टिव्ही कंपनीने सर्वांसमोर आणला होता. यामध्ये 88 इंचाचा OLED स्क्रीन देण्यात आला असून हा जगातील पहिला 8k OLED टिव्ही आहे. यामध्ये HDR आणि डॉल्बी फॉरमॅटही सपोर्ट करणार आहे. तसेच यामध्ये गुगल असिस्टंट आणि अॅमेझॉन अॅलेक्सालाही सपोर्ट करणार आहे.

हा LG चा सर्वात महागडा टिव्ही असणार आहे. तसेच या टिव्हीमध्ये अपस्केलिंग फिचरही देण्यात आले आहे. त्याच्या सहाय्याने 2k व्हिडिओ 8k व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट करून पाहता येणार आहेत. या टिव्हीमध्ये 80W बिल्ट इन स्पीकरही देण्यात आला आहे. दक्षिण कोरियामध्ये या टिव्हीची किंमत 50 दशलक्ष वॉन म्हणजेच 29 लाख रूपयांच्या जवळपास असणार आहे. प्री ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना यावर 20 टक्के सवलत देण्यात येणार असून तो 40 दशलक्ष वॉनला खरेदी करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 6:19 pm

Web Title: lg launched first 8k oled tv pre booking started
Next Stories
1 Saregama ने लाँच केलं ‘कारवां’चं मोबाईल व्हर्जन; किंमत 3,990 रुपये
2 पहिली इंटरनेट कार, MG Hector साठी उद्यापासून बुकिंग सुरू
3 Redmi K20 Pro चा जलवा, पहिल्याच सेलमध्ये 2 लाखांहून जास्त फोनची विक्री
Just Now!
X