News Flash

LG कडून अनेक बंपर ऑफर्स! स्मार्टफोनवर ₹5000; तर टीव्हीवर ₹15000 पर्यंत डिस्काउंट

लॉकडाउनमध्ये प्री-बूकिंगसाठी LG ने बनवली नवीन वेबसाइट...

इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन बनवणारी कंपनी LG ने काही आकर्षक ऑफर आणल्या आहेत. आता, लॉकडाउनदरम्यानही ग्राहक LG प्रोडक्ट्ससाठी बूकिंग करु शकणार आहेत. यासोबतच ग्राहकांना 15,000 रुपयांपर्यंत डिस्काउंटचाही फायदा मिळू शकतो.

काय आहे ऑफर आणि कसं कराल बूकिंग?
कंपनीकडून LG G8X ThinQ या स्मार्टफोनसाठी रजिस्टर करणाऱ्या ग्राहकांना 5,000 रुपये इस्टंट डिस्काउंट दिले जात आहे. याशिवाय ग्राहक Jabra ब्लूटूथ हेडसेट केवळ 1,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. स्मार्टफोनसाठी प्री-रजिस्ट्रेशन 15 मेपर्यंत सुरू असेल. तर, अन्य प्रोडक्ट्सवर मिळणारी ऑफर 30 मेपर्यंत असेल असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

याशिवाय, कंपनीकडून अनेक प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर दिली जात आहे. लॉकडाउनमध्ये निवडक प्रोडक्ट्सच्या प्री-बूकिंगसाठी LG कंपनीने https://www.lg.com/in/health-hygiene ही नवीन वेबसाइट बनवली आहे. या बेवसाइटवर ग्राहक त्यांना पाहिजे ते प्रोडक्ट बूक करु शकतात आणि अनेक आकर्षक ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. कंपनीकडून LG TV आणि ऑडिओ प्रोडक्ट्ससाठी रजिस्टर करणाऱ्यांना 15 टक्क्यांपर्यंत (जवळपास 15,000 रुपये) कॅशबॅक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड्स पेमेंटवर मिळत आहे. तसेच, LK7 स्पीकर्ससाठी कंपनी लकी-ड्रॉ घेणार आहे. OLED आणि UHD टीव्हीसाठी रजिस्टर करणाऱ्या ग्राहकांना 35,990 रुपये किंमतीचा दुसरा टीव्ही जिंकण्याची संधी मिळेल. तर, LG TV खरेदी करणाऱ्यांना 10,000 रुपयांचे गिफ्ट व्हाउचर्सही मिळतील. एसी आणि वॉशिंग मशिनवरही कंपनीने अनेक ऑफर्स आणल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 12:14 pm

Web Title: lg opens bookings with attractive offers on lg g8x thinq smart tvs acs and other consumer electronics sas 89
Next Stories
1 करोना वॉरिअर्सचे कॅडबरीनं मानले अनोख्या पद्धतीनं आभार
2 “जी काही ‘गंमत जंमत’ करायचीय ती लॉकडाउन संपल्यावर करा”; महाराष्ट्र पोलिसांचा सल्ला
3 Jio चा भन्नाट प्लॅन, दररोज 3GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
Just Now!
X