05 March 2021

News Flash

LG W10, W30 काही मिनिटांतच आउट ऑफ स्टॉक, पुढील सेल 10 जुलै रोजी

कमी किंमतीत सर्व आवश्यक फीचर्स असल्यामुळे ग्राहकांकडून या फोनला चांगला प्रतिसाद मिळतोय

LG कंपनीच्या W मालिकेतील LG W10, W30 या दोन बजेट स्मार्टफोनसाठी काल (दि.3) फ्लॅशसेलचं आयोजन करण्यात आलं होतं. अॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळावर दुपारी 12 वाजेपासून सुरू झालेल्या या सेलला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं आणि अवघ्या काही मिनिटांमध्येच हा फोन आउट ऑफ स्टॉक झाला. या सेलमध्ये नेमक्या किती युनिट्सची विक्री झाली याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही, पण सर्व युनिट्सची विक्री होताच कंपनीने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. तसंच, पुढील सेल 10 जुलै आयोजित करण्यात आल्याचीही माहिती दिली. याशिवाय 2019 मध्ये एलजीचे हे नवे फोन बेस्ट सेलिंग स्मार्टफोन ठरु शकतात असा विश्वसाही कंपनीने व्यक्त केला आहे. कमी किंमतीत सर्व आवश्यक फीचर्स असल्यामुळे ग्राहकांकडून या फोनला चांगला प्रतिसाद मिळतोय.


 
LG W10 –
W मालिकेतील सर्वात स्वस्त स्मार्टफोन अशी LG W10 या स्मार्टफोनची ओळख आहे. हा स्मार्टफोन 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो, मेमरी माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवणं शक्य आहे. फोनच्या मागील बाजूला फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी LG W10 मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. एलजीचा हा नवीन स्मार्टफोन 4जी एलटीई व डुअल सिमला सपोर्ट करतो. LG W10 मध्ये 4,000एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन टुलीप पर्पल आणि स्मॉकी ग्रे कलर मध्ये विकला जाईल.अँड्रॉइड 9 पायचा सपोर्ट असणारा हा फोन 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड ऑक्टाकोर प्रोसेसरसह 12एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेल्या मीडियाटेकच्या हेलीयो पी22 चिपसेटवर कार्यरत असतो. यात 6.19-इंचाचा एचडी+ नॉच डिस्प्ले आहे.

किंमत – 8 हजार 999 रुपये

LG W30 –
LG W30 स्मार्टफोनमध्ये 6.26 इंच HD+ IPS डॉट फुल व्हिजन स्क्रीन आहे. फिंगरप्रिंट सेंसर फीचर असलेला हा स्मार्टफोन हा स्मार्टफोन 2.0GHz ऑक्टाकोर मीडियाटेक Helio P22 प्रोसेसरवर कार्यरत असेल. फोनमध्ये 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज असून मागील बाजूला 13, 12 आणि 5 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. तर सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात 4,000 mAh क्षमतेची बॅटरी असून थंडर ब्ल्यू, प्लॅटिनम ग्रे आणि अॅरॉर ग्रीन कलरमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल.

किंमत – 9 हजार 999 रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2019 9:21 am

Web Title: lg w10 w30 out of stock in first sale next sale on 10th july sas 89
Next Stories
1 धूम्रपानापेक्षाही लठ्ठपणामुळे कर्करोगाची जास्त जोखीम
2 अपचनाचे धोके आणि त्यावरील उपाय
3 Bajaj CT 110 भारतात लाँच , किंमत 40 हजाराहून कमी
Just Now!
X