LG ने काही दिवसांपूर्वीच स्मार्टफोन बिझनेस बंद करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता कंपनीने आपल्या प्रीमियम स्मार्टफोनवर भरघोस डिस्काउंटची ऑफर आणली आहे. कंपनीने LG Wing या स्मार्टफोनच्या खरेदीवर घसघशीत सवलतीच्या ऑफरची घोषणा केली आहे. 12 ते 15 तारखेपर्यंत फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या फ्लॅगशिप फेस्ट सेलमध्ये LG Wing च्या खरेदीवर तब्बल 40,000 रुपयांची सवलत आहे.  LG ने मोबाइल बिझनेस बंद करत असल्याचं जाहीर केलं असलं तरी प्रीमियम स्मार्टफोन्सना पुढील तीन वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट जारी करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. सविस्तर जाणून घेऊया या ऑफरबाबत :-

फ्लिपकार्टवरील सेलमध्ये LG Wing फक्त 29,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लाँच झाला, त्यावेळी याची किंमत 69,990 रुपये होती. आता फ्लिपकार्टवर LG Wing  40,000 रुपयांच्या घसघशीत सवलतीसह उपलब्ध झाला आहे.

LG Wing स्पेसिफिकेशन्स :-
LG Wing ची खासियत म्हणजे याची वेगळी डिझाइन आहे. याचा डिस्प्ले 90 डिग्रीपर्यंत फोल्ड होतो. या फोनमध्ये ड्युअल सिमचा सपोर्ट असून अँड्रॉइड 10 वर आधारित Q OS वर हा फोन कार्यरत आहे. फोनमध्ये 6.8 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले असून रिझॉल्यूशन 1080×2460 पिक्सेल आहे. या फोनमध्ये  P-OLED फुल व्हिजन प्रायमरी डिस्प्ले आहे. तर, दुसरा डिस्प्ले 3.9 इंचाचा  फुल एचडी प्लस G-OLED आहे. शिवाय, स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी/256 जीबी स्टोरेज मिळेल. तसेच, मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 2 टीबीपर्यंत वाढवण्याचा पर्यायही आहे.

LG Wing  कॅमेरा :-
LG Wing मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. फोनमधील मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सेल क्षमतेचा आहे. तर, दुसरा 13 मेगापिक्सेलचा आणि तिसरा कॅमेरा 12 मेगापिक्सेलचा टेरेटरी सेन्सर आहे. फोनमध्ये हेस्का मोशन स्टेबलाइज आणि गिंबल कॅमेरा सपोर्टही मिळेल. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये  32 मेगापिक्सेलचा पॉपअप कॅमेराही आहे.  तर,  कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीने या फोनमध्ये 5G, 4G LTE-A, Wi-Fi, ब्लूटूथ, NFC, जीपीएस/ए-जीपीएस आणि युएसबी टाइप सी पोर्ट हे पर्याय दिलेत. फोनमध्ये इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 4000mAh बॅटरी दिली आहे.