01 October 2020

News Flash

जीवन लाभ विमा : दररोज करा २३३ रुपयांची गुंतवणूक, मिळवा १७ लाखापर्यंत रिटन्स

लोक बचत तर करतात मात्र त्यांना गुंतवणूक कुठे करायचं सुचत नाही

(संग्रहित छायाचित्र)

LIC Jeevan Labh Policy : एलआयसी (भारतीय जीवन विमा महामंडळ) देशातील सर्वात विश्वासू विमा कंपनी म्हणून ओळखली जाते. एलआयसी ग्राहकांना विविध प्रकारच्या विमा पॉलिसी देते. त्यामुळे गरिबांसह श्रीमंतही एलआयसी पॉलिसीमध्ये गुंतवणूक करतात. गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत गुतंवणूक करु शकणाऱ्या पॉलिसी एलआयसीनं तयार केल्या आहेत. लोक बचत तर करतात मात्र त्यांना गुंतवणूक कुठे करायचं सुचत नाही. अशाच लोकांसाठी एलआयसीच्या एका महत्त्वाच्या विमा पॉलिसीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये दररोज २३३ रुपये गुंतवणूक केल्यास तुम्हाला १७ लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. या पॉलिसीचं नाव ‘जीवन लाभ’ असं आहे.

जीवन लाभ विमा पॉलिसी मर्यादित प्रिमियमसह नॉन-लिंक्ड लाभ पॉलिसी आहे. यामधील मॅच्युअरिटी रक्कम टैक्स फ्री आहे. या पॉलिसमध्ये तुम्ही १६ वर्ष, २१ वर्ष किंवा २५ वर्ष असा टर्म प्लॅन आहे. मृत्यू किंवा पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर कुटुंबाला किंवा पॉलिसीधारकाला विमा रक्कम मिळते. याची मॅच्युअरिअटीचं वय जास्तीत जास्त ७५ वर्ष ठेवण्यात आलं आहे.

२३३ रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर बक्कळ रक्कम कशी जमवू शकता पाहुयात.
वय २४ ,
टर्म: १६
पीपीटी: १०
डीएबी: १०,००,०००
डेथ सम एश्योर्ड: १०,००,०००
बेसिक सम एश्योर्ड : १०,००,०००

पहिल्या वर्षाचं प्रिमियम ४.५ टक्के टॅक्ससह
वार्षिक : 87251 (83494 + 3757)
अर्धवार्षिक: 44072 (42174 + 1898)
त्रैमासिक: 22259 (21300 + 959)
मासिक: 7420 (7100 + 320)
वायएलवाय मोड सरासरी प्रिमियम/प्रतिदिन – 239

पहिल्या वर्षी प्रिमियम भरल्यानंतर घटलेले टॅक्ससह –

वार्षिक: 85373 (83494 + 1879)
अर्धवार्षिक: 43123 (42174 + 949)
त्रैमासिक: 21779 (21300 + 479)
मासिक : 7260 (7100 + 160)
वायएलवाय मोड सरासरी प्रिमियम/प्रतिदिन : 233

एकूण अनुमानित देय प्रिमियम: 855608 रुपये

मॅच्योरिटीवर अनुमानित रिटर्न :
एस.ए: 1000000
बोनस: 688000
एफएबी: 25000
एकूण अनुमानित रिटर्न: 1713000 रुपये

वरील उदाहरणानुसार जर एखादा व्यक्ती वयाच्या २४ वर्षी १६ वर्षांचा टर्म प्लॅनसह 1000000 सम एश्योर्ड चा विकल्प निवडत असेल तर त्याला १० वर्षांपर्यंत दररोज २३३ रुपये भरावे लागतील. त्याला एकूण 855608 रुपये भरावे लागतील. मॅच्योरिटीनंतर ही रक्कम1713000 रुपये होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 3:19 pm

Web Title: lic jeevan labh policy you can invest rs 233 daily and get 17 lakhs know full plan nck 90
Next Stories
1 केरळ विमान अपघात : टेबलटॉप रनवे म्हणजे काय? का मानला जातो हा रनवे धोकादायक?
2 देशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली, शेतकऱ्यांना असा होणार फायदा
3 ‘अयोध्या तो झाँकी है, काशी- मथुरा बाक़ी है’ : पण काशी-मथुरा वाद नक्की आहे तरी काय?
Just Now!
X