आरोग्यदायी जीवनासाठी अमेरिकेत संशोधन
अचूक वय दर्शविणारे उपकरण अमेरिकेतील संशोधकांनी तयार केले आहे. यात व्यक्तीच्या प्रत्येक अवयवाचे वयोमान दाखविण्यात येते आणि त्या अवयवाचे सध्याचे कार्य किती सक्षमरीत्या सुरू आहे, याची माहिती मिळते. विशेष म्हणजे या साऱ्या ठोकताळ्यांच्या आधारावर एखादी व्यक्ती भविष्यात किती वर्षे आरोग्यदायी आयुष्य जगणार आहे, याचा अंदाजही संशोधकांना वर्तविण्यात यश आले आहे.
अवयवांची स्थिती आणि वय याआधारे मनुष्याचे आरोग्य कसे सुधारता येईल आणि आयुष्यमान कसे वाढवता येईल, यासाठी मार्गदर्शक प्रणाली उपलब्ध झाली आहे.
वयोमानासंदर्भात संशोधन करणाऱ्या दक्षिण कोरियाच्या मूलभूत विज्ञान संस्था आणि प्रिन्स्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी मिळून हे संशोधन केले आहे. विशेष करून वृद्धांमधील अवयवांची चिकित्सा करून त्यांची कार्यक्षमता कशी वाढवता येईल, यावर या संशोधनात भर देण्यात आला. यासाठी एक प्रारूप तयार करण्यात आले. हे प्रारूप मानवी शरीर कसे विकसित होत नंतर ते वृद्धत्वाकडे जाते, याची माहिती संशोधकांना पुरवणार आहे. वृद्ध माणसाच्या हालचाली पुढे पुढे मंदावत जातात, म्हणजे शरीरात नेमके काय बदल होतात. ते नव्याने कसे कार्यक्षम करता येईल, यावर संशोधकांनी प्रामुख्याने भर दिला.
‘शॉट फिजिकली परफॉर्मन्स बॅटरी’च्या मोजमापाच्या चालण्याच्या गतीमुळे शरीरातील विशिष्ट रासायनिक प्रक्रियेला चालना मिळाली आहे. संशोधकांनी सी इलेगन्सच्या किडय़ांची जास्तीत जास्त गती ३० सेकंद आयुष्यभर इतकी केली.
नंतर एका प्रयोगामध्ये सहाव्या दिवशी किडय़ांची गती कमी झालेली आढळली, आणि नंतर माणसाच्या हालचालीच्या क्षमतेमध्ये आयुष्यातसुद्धा घट झालेली पाहायला मिळाली. पुढे नवव्या दिवशी तेच घडले. २३व्या दिवशी उच्च गतीच्या किडय़ाचे आयुष्यमान आणि लांबी कमी गतीच्या किडय़ांपेक्षा ३५ टक्क्य़ांपेक्षा जास्त वाढले.
वृद्ध माणूस हळूहळू कमजोर होतो आणि त्याची ताकद कमी होऊ लागते. कमी गतीच्या किडय़ांबरोबरसुद्धा असेच होते. २६व्या दिवशी सर्व जंगली किडय़ांचा मृत्यू होतो. संशोधनात उच्च गती ‘सी इलेगन्स’ वयाशी निगडित शारीरिक घटकावर योग्य अहवाल देत असल्याचे संशोधकांनी नमूद केले.