संध्याकाळच्या वेळी देवापुढे दिवा लागला की घरातील वातावरण आणि मन प्रसन्न होऊन जातं. यामध्येच जर धूप किंवा कापूर लावला तर घरात एक सकारात्मक ऊर्जा येते असं म्हटलं जातं. त्यामुळेच कोणतीही पुजा किंवा शुभकार्य असेल तर देवासमोर कापूर आरती केली जाते. आता कापूर केवळ पूजेसाठी वापरतात हे इतकंच साऱ्यांना ठावूक आहे. पण, कापूराचे अन्य अनेक फायदे आहेत, ज्यामुळे काही शारीरिक तक्रारीदेखील दूर होतात. त्यामुळेच कापूराचे नेमकं फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. कापूरामुळे जखम लवकर भरुन निघते. त्यासाठी पाण्यात थोडासा कापूर मिक्स करुन ते पाणी जखमेवर लावावं.

२. केसातील कोंडा कमी होतो. खोबरेल तेलात कापूर टाकून त्या तेलाने केसांना मसाज करावा व नंतर केस धुवून टाकावेत.

३. शरीरावर सतत खाज येत असेल तर कापूर घातलेलं तेल प्रभावीत जागेवर लावावं.

४. कापूर तेलाने मसाज केल्यामुळे सांधेदुखी कमी होते.

५. पायांच्या भेगा कमी होतात.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)