डॉ. प्रतिक तिबदेवाल

पावसाळा सुरु झाला की हळूहळू अनेक आजार, विकार डोकं वर काढू लागतात. पावसाळ्यात पोटदुखी, उलट्या-जुलाब हे आजार साधारणपणे होत असल्याचं साऱ्यांनाच ठाऊक आहे. पण या आजारांव्यतिरिक्त अन्यही काही आजार आहेत जे या काळात होत असतात. चला तर जाणून घेऊया या आजारांविषयी आणि या काळात नेमकी कोणती काळजी घ्यावी त्याविषयी.

पावसाळ्यात होणारे आजार –

१. या काळात बऱ्याचदा दुषित पाणीपुरवठा होतो. हे दुषित पाणी प्यायल्यामुळे डायरिया, कॉलरा यासारख्या समस्या उद्भवतात.

२. वाताचा विकार

३. गॅस्ट्रो

४. लेप्टोस्पायरोसिस

५. टायफॉइड

६.कॉलरा

७. कावीळ
पावसाळ्यात घ्या ‘ही’ काळजी

१. पावसाळ्यात कायम उकळून थंड केलेलं पाणी प्यावं.

२. पाणी गाळून भरावं.

३. शारीरिक स्वच्छता बाळगा. शौचालयाचा वापर केल्यास हात व पाय स्वच्छ धुवा.

४. अंघोळीच्या पाण्यात अॅटीसेप्टीक लिक्विड टाका.

५. शिळे, अर्धवट शिजवलेले पदार्थ खाण्याचं टाळा.

६. पाणी साठवून ठेवू नका. वेळच्या वेळी बदलत रहा. तसंच पाण्याची भांडी नीट झाकून ठेवा.

७. आहारात भाज्या, फळे यांचा समावेश करा.

(लेखक डॉ. प्रतिक तिबदेवाल हे मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात पोटविकारतज्ज्ञ आहेत.)