News Flash

पदार्थाची चव वाढविणाऱ्या मोहरीचे जाणून घ्या गुणकारी फायदे

जाणून घ्या पदार्थांना चविष्ट करणाऱ्या मोहरीचे गुणकारी फायदे

कोणत्याही मसालेदार पदार्थाची चव वाढवायची असेल तर त्यावर खमंग अशी मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी ही हवीच. ढोकळा, खांडवी, अळूवडी या पदार्थांना तर हमखास कडकडीत तेल आणि मोहरीची फोडणी देतात. त्यामुळे भारतीय स्वयंपाक घरात मोहरीला विशेष स्थान आहे. कोणतीही भाजी किंवा आमटी करताना वापरण्यात येणाऱ्या मोहरीचा वापर केवळ पदार्थाची चव वाढविण्यासाठीच होतो असं नाही. तर, तिच्यात काही शरीरासाठी आवश्यक गुणधर्मदेखील आहेत. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात मोहरीचे काही फायदे

१. मोहरीचे तेल उष्ण आहे. त्यामुळे अनेक जण हिवाळ्यामध्ये या तेलाचा वापर करतात. अर्धागवायू, संधिवात, आमवात, सायटिका, खांदा जखडणे, मान गुडघ्याचे विकार या सगळ्या वातविकारांमध्ये मोहरीचं तेल किंवा मोहरी वाटून त्याचा लेप दुखऱ्या भागावर लावावा. परंतु, मोहरीचं तेल उष्ण असल्यामुळे अनेकांना ते सोसवत नाही अशावेळी त्यात अन्य एखादं तेल मिक्स करुन मग ते वापरावे.

२.तीळ तेल, एरंडेल तेल, लिंबोणी तेल, करंजेल तेल यांच्या जोडीला मोहरी तेलाच्या मदतीमुळे, अभ्यंगार्थ महानारायण तेल तयार केले जाते.

३.कोणत्याही सर्दीला इतर उपचार दाद देत नसतील तर मोहरीची चिमूटभर पूड मधाबरोबर खावी.

४. कोणताही विषारी पदार्थ पोटात गेल्यास मोहरीचे पाणी प्यावे. मोहरीचे पाणी प्यायल्यामुळे पटकन उलटी होते व विषारी पदार्थ बाहेर टाकला जातो.

५.छातीत खूप कप झाल्यास मोहरी व मीठ यांचा काढा प्यावा. काढा प्यायल्यावर उलटी होते आणि छातीत जमा झालेला कफ बाहेर पडण्यास मदत होते. परंतु, हा प्रयोग केवळ तरुण व्यक्तींनीच करावा. लहान मुले किंवा वृद्ध व्यक्ती यांनी हा प्रयोग करु नये.

६.जंत व कृमी सहजपणे पडत नसल्यास मोहरीची चिमूटभर पूड तीन दिवस घ्यावी. जंत नाहीसे होतात.

७.पोटदुखी, डोकेदुखी याकरिता मोहरी वाटून त्या त्या अवयवांवर लेप लावावा.

८.लघवी साफ होण्यासाठी ओटीपोटावर लेप लावावा.

९.पोटफुगी, अपचन, अजीर्ण याकरिता मोहरी चूर्ण आल्याच्या रसाबरोबर घ्यावे. मोहरी खूप उष्ण आहे, याचे भान नेहमी ठेवावे.

(कोणतेही उपाय करुन पाहण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 2:58 pm

Web Title: lifestyle benefits mustard beans ssj 93
टॅग : Lifestyle News
Next Stories
1 सोन्यानंतर आता ‘डायमंड करोना मास्क’ची क्रेझ
2 …म्हणून रात्री झोपण्यापूर्वी घ्या त्वचेची काळजी
3 Samsung ने लाँच केलं पहिलं ‘मेड इन इंडिया’ स्मार्टवॉच, 31 जुलैपर्यंत ‘कॅशबॅक’ची शानदार ऑफर
Just Now!
X