हिवाळ्याची चाहुल लागली की भाजीमंडईमध्ये हिरव्यागार मटारांची रेलचेल दिसू लागते. कवळे मटार चवीला अत्यंत गोड आणि चविष्ट लागतात. त्यामुळे अनेक गृहिणी खास मटार घेऊन त्यापासून वेगवेगळे पदार्थ करतात. यामध्ये मटार पुलाव, मटार-पनीर, मटारच्या करंज्या असे अनेक पदार्थ केले जातात. परंतु, मटार खाण्याचे काही फायदे आहेत, जे अनेकांना ठावूक नसतील. त्यामुळे मटार खाण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.
१. मटार खाल्ल्यामुळे वजन नियंत्रणात येते.
२. कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.
३. रक्तदाब नियंत्रणात राहतो.
४. बद्धकोष्ठता दूर होते.
५. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
६. हाडे मजबूत होतात.
७. केसगळती कमी होते.
८. विसराळूपणा कमी होतो.
९. त्वचा टवटवीत राहते.
१०. पोटाच्या समस्या दूर होतात.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 7, 2020 4:29 pm