अनेकांना दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ फारसे आवडत नाहीत. मात्र, या सगळ्यात पनीर हा अपवाद आहे. पनीर हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. कोणत्याही भाजीच किंवा सॅलेडमध्ये पनीर घातलं की त्या पदार्थाची चव दुप्पट वाढते. विशेष म्हणजे आजकाल स्टार्टसमध्येदेखील पनीरचे विविध प्रकार मिळू लागले आहेत. त्यामुळे पनीर हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. पनीर हा चवीला उत्तम असण्यासोबतच त्याचे अन्यदेखील काही गुणकारी फायदे आहेत. त्यामुळे पनीर खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. दात बळकट राहतात.

२. भुकेवर नियंत्रण राहते.

३. शरीरात अतिरिक्त वाढलेली चरबी कमी होण्यास मदत मिळते.

४. शरीराला आवश्यक प्रथिनांचा साठा

५. घातक आजारांपासून बचाव

६.पनीरच्या सेवनामुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ खुंटते.

७. हृदयविकाराचा धोका कमी होतो.

(ही बातमी जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)